S M L

कर्नाटकचं नंदिनी दूध आता महाराष्ट्रात, जानकरांच्या हस्ते लाँचिंग

Samruddha Bhambure | Updated On: Oct 19, 2016 01:36 PM IST

कर्नाटकचं नंदिनी दूध आता महाराष्ट्रात, जानकरांच्या हस्ते लाँचिंग

19 ऑक्टोबर :  गुजरातच्या ‘अमूल’ने महाराष्ट्रात बस्तान बसवल्यानंतर आता कर्नाटकच्या दुधाचा ब्रँडही राज्यात एन्ट्री घेत आहे. ‘नंदिनी’ या दुधाच्या ब्रँडचं मुंबईत लाँचिंग होणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कार्यक्रमाला दुग्धविकासमंत्री महादेव जानकर या उद्घाटनाला हजेरी लावणार आहेत.

महाराष्ट्राच्या ‘आरे’ची दयनीय व्यवस्था असताना खुद्द दुग्धविकासमंत्री महादेव जानकर या उद्घाटनाला हजेरी लावणार असल्यामुळे राज्य सरकारच कर्नाटकच्या दुधाच्या ब्रँडला पायघड्या घालत असल्याचं चित्र आहे.

राज्यात आणि मुंबईत सध्या सहकारी दूध उत्पादक संस्थांची अवस्था बिकट आहे. खासगी दुग्ध उत्पादकांची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी गोकूळ, वारणा, कात्रज या संस्थांच्या मदतीने महाराष्ट्राचा एकच ब्रँड आणण्याचा मनोदय नुकतंच जानकर यांनी बोलून दाखवलं होतं. मात्र आता तेच कर्नाटक सरकारच्या दुधाच्या ब्रँडच्या उद्घाटनाला उपस्थित राहणार असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे.

भारतातील दुसरा क्रमांकावरील दूध ब्रँड म्हणून नंदिनी ओळखला जात असल्याची जाहिरात केली जाते. राज्यातील दैनंदिन दूध संकलन सुमारे 14 कोटी लिटर असलं, तरी त्यात खासगी दुधाचा वाटा 55 ते 60 टक्क्यांपर्यंत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2016 01:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close