S M L

तरुणींवर 'सर्जिकल स्ट्राईक' करणाऱ्या चहावाल्याला मॉडेलिंगची ऑफर

Samruddha Bhambure | Updated On: Oct 19, 2016 06:09 PM IST

तरुणींवर 'सर्जिकल स्ट्राईक' करणाऱ्या चहावाल्याला मॉडेलिंगची ऑफर

 

19 ऑक्टोबर: मिका सिंगचं 'ब्लू आईज हिप्नोटाईज तेरी करदी ऐ मेनू' हे गाणं आजवर अनेक तरूणांनी मुलींना बघून गायलं असेलं. पण पाकिस्तानमधल्या निळ्या डोळ्यांचा एक चहावाला सध्या सोशल मीडियावर अनेक तरूणींना हिप्नोटाईज केलं आहे. सोशल मीडियावर स्टार झाल्यावर या अर्शदला आता मॉडेलिंगचीही ऑफर मिळाली आहे.

'अर्शद खान' असं या चहावाल्याचं नावं असून तो फक्त 18 वर्षांचा आहे. इस्लामाबादच्या एका ऑनलाईन शॉपिंग सेंटरच्या व्यापाऱ्याने अर्शदचे फोटोही पोस्ट केलं आहेत. तो आपल्या ब्रॅंडसाठी मॉडेलिंग करेल असं जाहीरही करुन टाकले आहे.

अर्शदचा व्हायरल झालेला हा फोटो पाहून तो एक 'चहावाला' आहे, यावर कुणाचाच विश्वासच बसत नाही. अर्शदच्या निळ्या रंगाच्या डोळ्यांनी पाकिस्तानीच नव्हे तर भारतीय तरुणींनाही 'हिप्नोटाईज' केली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियावर तर #chaiwala असा ट्रेंडिंगला होता. जिया अलीच्या अकाऊंटवरुन सर्वात आधी या चहावाल्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यानंतर या फोटोला लाईक आणि शेअरचा अक्षरश: महापूर आला.

Hot-tea

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 19, 2016 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close