S M L

विरार-डहाणू दरम्यान धावत्या लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी

Sachin Salve | Updated On: Oct 20, 2016 01:55 PM IST

विरार-डहाणू दरम्यान धावत्या लोकलमध्ये प्रवाशांची हाणामारी

20 ऑक्टोबर : चर्चगेट-डहाणू लोकलमध्ये 2 प्रवासी गटात तुंबळ हाणामारी झाली. चालू गाडीत ही मारहाण सुरू होती. रात्री 9 .30 ते 10 च्या सुमारास हा प्रकार घडला. अखेर गाडी विरार स्थानकात आल्यावर आरपीएफ़ने लाठीचार्ज करून 5 जणांना अटक केली होती.

मंगळवारीही विरारमधील काही प्रवाशांना विरार स्थानकात उतरू न देता डहाणूतील प्रवाशांच्या गटाने रस्ता आडवून धरत त्यांना थेट वैतरणा रेल्वे स्थानकात उतरवलं होतं. काल पुन्हा लोकलमध्ये त्याच गोष्टीवरून 2 गटांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. विरारमधले प्रवासी डहाणू लोकलमधून प्रवास करीत असल्याचा राग मनात धरून हा प्रकार घडलाय.  या प्रकरणी आज पाचही प्रवाशांना प्रत्येकी दोन हजाराच्या जामिनावर मुक्तता करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 20, 2016 10:42 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close