S M L

हुतात्म्यांच्या आठवणी पडद्याआड

दीप्ती राऊत, नाशिक29 एप्रिलसंयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नाशिकचे दोघेजण शहीद झाले होते. पंचवटीतील जोशी आणि बेलदार गल्लीतले माधव तुरे. पण आज त्यांच्या आठवणी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.कारण त्यांच्या स्मृती कुठे जपल्याच गेल्या नाहीत. तुरेंचे भाऊ लक्ष्मण यांनी जपून ठेवलेले 57 सालातील पत्रक हा एकमेव या हुतात्म्यांचा एकमेव पुरावा...मी असताना गुजराथ्यांची दुकाने लुटली जात होती. गुजरात महाराष्ट्र बळकावत होता म्हणून हा दंगा सुरू असल्याचे आम्हाला समजले. त्यात आमच्या भावालाही गोळी लागली, अशी आठवण लक्ष्मण तुरे सांगतात. त्यानंतर 20 जानेवारी 1957 ला रविवार कारंज्यावर नाशिक शहर संयुक्त महराष्ट्र समितीने श्रद्धांजली सभा घेतली. त्यात एक ठराव केला. त्यानुसार नाशिक नगरपालिकेने तेथील चौकाला माधव तुरेंचे नाव दिले. नावाची पाटीही लावली गेली. पण काळाच्या ओघात ती गायब झाली आहे. आता माधव तुरेंच्या स्मृती उरल्यात त्या फक्त हुतात्म्यांच्या यादीतील 97 वा क्रमांक म्हणून.विशेष म्हणजे त्यावेळी हुतात्मांना देऊ केलेली 500 रुपयांची मदत त्यांच्या आईने नाकारली होती.अशा या हुतात्म्यांची परवड याच सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रात होत आहे. माधव तुरे हे त्यातील एक उदाहरण...

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2010 10:20 AM IST

हुतात्म्यांच्या आठवणी पडद्याआड

दीप्ती राऊत, नाशिक

29 एप्रिल

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नाशिकचे दोघेजण शहीद झाले होते. पंचवटीतील जोशी आणि बेलदार गल्लीतले माधव तुरे. पण आज त्यांच्या आठवणी काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.

कारण त्यांच्या स्मृती कुठे जपल्याच गेल्या नाहीत. तुरेंचे भाऊ लक्ष्मण यांनी जपून ठेवलेले 57 सालातील पत्रक हा एकमेव या हुतात्म्यांचा एकमेव पुरावा...

मी असताना गुजराथ्यांची दुकाने लुटली जात होती. गुजरात महाराष्ट्र बळकावत होता म्हणून हा दंगा सुरू असल्याचे आम्हाला समजले. त्यात आमच्या भावालाही गोळी लागली, अशी आठवण लक्ष्मण तुरे सांगतात.

त्यानंतर 20 जानेवारी 1957 ला रविवार कारंज्यावर नाशिक शहर संयुक्त महराष्ट्र समितीने श्रद्धांजली सभा घेतली. त्यात एक ठराव केला. त्यानुसार नाशिक नगरपालिकेने तेथील चौकाला माधव तुरेंचे नाव दिले. नावाची पाटीही लावली गेली. पण काळाच्या ओघात ती गायब झाली आहे.

आता माधव तुरेंच्या स्मृती उरल्यात त्या फक्त हुतात्म्यांच्या यादीतील 97 वा क्रमांक म्हणून.

विशेष म्हणजे त्यावेळी हुतात्मांना देऊ केलेली 500 रुपयांची मदत त्यांच्या आईने नाकारली होती.

अशा या हुतात्म्यांची परवड याच सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रात होत आहे. माधव तुरे हे त्यातील एक उदाहरण...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2010 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close