S M L

हिरानंदानींच्या गॅस उर्जा प्रकल्पाला विरोध

सचिन चपळगावकर, पुणे29 एप्रिलपुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेजवळ हिरानंदानी ग्रुपचा गॅस ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. पण या प्रकल्पामुळे परिसरात मोठे प्रदूषण होईल, असे सांगत नवलाख-उंब्रे गावातील लोकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे. प्रकल्पामुळे गावातील ऐतिहासिक मंदीरासोबतच शेती आणि पर्यावरणालाही धोका निर्माण झाल्याची गावकर्‍यांची तक्रार आहे. मात्र या प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही, असा दावा हिरानंदानी ग्रुपकडून करण्यात येत आहे.या प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनात निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे आणि वारकरी महासंघाचे बंडातात्या कराडकर उतरले आहेत. 280 एकरवरील या गॅस ऊर्जा प्रकल्पाला गावकर्‍यांचा दिवसेंदिवस गावकर्‍यांचा तीव्र विरोध होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 27, 2010 11:00 AM IST

हिरानंदानींच्या गॅस उर्जा प्रकल्पाला विरोध

सचिन चपळगावकर, पुणे

29 एप्रिल

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडेजवळ हिरानंदानी ग्रुपचा गॅस ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. पण या प्रकल्पामुळे परिसरात मोठे प्रदूषण होईल, असे सांगत नवलाख-उंब्रे गावातील लोकांनी या प्रकल्पाला तीव्र विरोध केला आहे.

प्रकल्पामुळे गावातील ऐतिहासिक मंदीरासोबतच शेती आणि पर्यावरणालाही धोका निर्माण झाल्याची गावकर्‍यांची तक्रार आहे. मात्र या प्रकल्पामुळे प्रदूषण होणार नाही, असा दावा हिरानंदानी ग्रुपकडून करण्यात येत आहे.

या प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनात निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे आणि वारकरी महासंघाचे बंडातात्या कराडकर उतरले आहेत. 280 एकरवरील या गॅस ऊर्जा प्रकल्पाला गावकर्‍यांचा दिवसेंदिवस गावकर्‍यांचा तीव्र विरोध होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 27, 2010 11:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close