S M L

शॉक देऊन तरुणीवर बलात्कार; आरोपीच्या भावाची आत्महत्या

Samruddha Bhambure | Updated On: Oct 21, 2016 02:07 PM IST

vadala_rape_case

21 ऑक्टोबर : समाजात अत्याचार आणि त्यांचं रुप झपाट्यानं आणखी वाईट होत चाललं आहे. सांगलीमधल्या तासगावमध्ये तरुणीवर शॉक देऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी मयूर पवार या आरोपीस पोलिसांनी अटक केली. याबाबतची माहिती मिळताच मयूर याच्या भावानं होणार्‍या बदनामीच्या भीतीमुळे गळफास घेऊन  आत्महत्या केली.

तासगावमध्ये रॉक ऑन डान्स अकॅडमी आरोपी मयूर पवारची आहे. पीडित तरुणी तिथे गेल्या वर्षभरापासून  काम करतीये.  याच दरम्यान त्यांची ओळख निर्माण झाली. या ओळखीचा फायदा घेत त्यानं याआधीही तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पण तिनं वेळोवेळी विरोध केला. पण 17 ऑक्टोबरला त्यानं तिला एका ठिकाणी बोलावलं, आणि एका बंद खोलीत तिला घेऊन गेला. तिथे लोखंडी सळईनं मारहण करून आणि शॉक देऊन तिच्यावर बलात्कार केला. आपल्या भावाने हे हैवानी कृत्य केल्याचं समजताच आरोपी मयूरचा भाऊ चैतन्य पवारने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, आरोपी मयूर पवार याला अटक करण्यात अाली असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2016 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close