S M L

पती वेळ देत नाही म्हणून पत्नीची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2016 05:59 PM IST

पती वेळ देत नाही म्हणून पत्नीची आत्महत्या

औरंगाबाद, 22 ऑक्टोबर : नवरा वेळ देत नाही म्हणून पत्नीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडलीये. प्रवलिका तेराम मनोहर असं या महिलेचं नाव आहे.

काही दिवसांपूर्वी तिचं औरंगाबादमधील एका तरूणाशी प्रेम संबंध जुळले त्यानंतर त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर ती औरंगाबादमधील पडेगाव इथं रहायला आली होती. तिचा नवरा आयसीआयसीआय बँकेत काम करत होता. कामाच्या व्यापात पत्नीकडे लक्ष देणं शक्य नसल्याने त्याचं तिच्याकडे दुर्लक्ष होत होतं. मात्र, एकटेपणा असह्य झाल्याने आज तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे, आत्महत्येपूर्वी तिने पतीला सेल्फी पाठवला होता. त्याने घराकडे धाव घेतली पण तोपर्यंत तिने जीवन संपवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2016 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close