S M L

सलग तिसऱ्यांदा भारत कबड्डी वर्ल्ड कप चॅम्पियन !

Sachin Salve | Updated On: Oct 22, 2016 10:01 PM IST

सलग तिसऱ्यांदा भारत कबड्डी वर्ल्ड कप चॅम्पियन !

22 ऑक्टोबर : भारताने इराणला धुळ चारत सलग तिसऱ्यांदा कबड्डी वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीत भारताने इराणला 38-29 अशा फरकाने धोबीपछाड दिला. या विजयासह भारताने कबड्डी वर्ल्ड कपमध्ये विजयाची हॅटट्रिक साधली. अजय ठाकूर भारताच्या विजयाचा हिरो ठरला.

अहमदाबादमधील द एरेना बाय ट्रांसस्टेडियमवर भारत आणि इराण दरम्यान कबड्डी वर्ल्डकपसाठी महामुकाबला रंगला. भारताने मॅचच्या सुरुवातील धडाक्यात सुरुवात केली पण कप्तान अनूप कुमाराला रिकाम्या हाती परतावे लागले. नंतर अजय ठाकूरने भारताचं 2-0 ने खातं उघडलं. पण इराणने बोनस अंकासह 2-2 ने बरोबरी साधली. कधी भारताने आघाडी घेतली तर कधी इराणने आघाडी घेतली. इराणचा खेळाडू मिराजने 2 अंक घेत आपल्या टीमला 9-2 ने आघाडी दिली.

हाफटाईम पर्यंत इराणने 18 -13 ने आघाडी कायम राखली. दुस-या हाफमध्ये भारताने आपल्या रणनीतीत बदल करून जोरदार कमबॅक केलं. आणि सलग दोन रेड टाकत 20-20 ने बरोबरी साधली. बरोबरी साधल्यानंतर भारताने इराणला ऑलआऊट करत 24-21 ने आघाडी घेतली. या आघाडीने भारतीय चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं.

या आघाडीनंतर भारताने मागे फिरून पाहिलं नाही आणि थेट 38 -29 ने इराणला धूळ चारली. अजय ठाकूर भारतीय विजयाचा शिल्पकार ठरला. अजयने पहिल्या हाफपासून ते शेवटपर्यंत भारताच्या विजयाचा पाया मजबूत केला. अजयने एकूण 12 अंक मिळवले. या विजयासह भारताने सलग तिसऱ्यांदा कबड्डी वर्ल्ड कपवर नाव कोरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय टीमचं अभिनंदन केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 22, 2016 10:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close