S M L

युरोपाची मंगळ मोहीम अपयशी?

Samruddha Bhambure | Updated On: Oct 23, 2016 06:47 PM IST

युरोपाची मंगळ मोहीम अपयशी?

vlcsnap-5909-10-11-09h36m18s424

23 ऑक्टोबर:  युरोपियन स्पेस एजन्सीचं 'स्कियापरेली' हे यान मंगळावर उतरताना क्रॅश झालं, अशी भीती संशोधकांना वाटतेय. मंगळावर या यानाचं नीट लँडिंग झालं नाहीये. युरोपियन स्पेस एजन्सीने हे यान मंगळावर कसं उतरेल याचं एक प्रात्यक्षिक बनवलं होतं. हे यान पॅराशूटच्या माध्यमातून मंगळावर उतरवण्याची योजना होती. पण हे पॅराशूट लवकर उघडलं आणि यानाचं लँडिंग अपयशी ठरलं, असं बोललं जातंय. याबद्दल अजून युरोपियन स्पेस एजन्सीने काहीही वक्तव्य केलेलं नाही पण मंगळमोहिमेबद्दल फारसं सकारात्मक बोललं जात नाहीये.

पॅराशूटपासून वेगळं होण्याचा 'स्कियापरेली'चा वेग जास्त असल्यामुळे लँडिंगमध्ये अडथळे आले असावे, असं संशोधक आणि तंत्रज्ञांना वाटतंय.

याआधी 2003 मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीचं बीगल - 2 हे यानही मंगळावर उतरू शकलं नव्हतं. त्यामुळे ही मोहीम अपयशी ठरली होती. आता 'स्कियापरेली' हे यान मंगळावर उतरू शकलं नाही तर युरोपियन स्पेस एजन्सीसाठी तो मोठा धक्का ठरणार आहे. असं असलं तरी यातून खचून न जाता 2021 च्या मोहिमेची तयारी युरोपियन स्पेस एजन्सीने सुरू केलीय. यामधून धडा घेऊन आम्ही मंगळावर सहा चाकांचं यान उतरवण्याचा प्रयोग यशस्वी करून दाखवू,असं संशोधकांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2016 12:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close