S M L

मुख्यमंत्र्यांनी देशभक्ती 5 कोटींना विकत घेतली - शबाना आझमी

Samruddha Bhambure | Updated On: Oct 24, 2016 02:00 PM IST

मुख्यमंत्र्यांनी देशभक्ती 5 कोटींना विकत घेतली - शबाना आझमी

24 ऑक्टोबर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशभक्ती 5 कोटींना विकत घेतली,अशी कडाडून टीका अभिनेत्री शबाना आझमी यांनी केलीय. 'ए दिल है मुश्किल'चा मार्ग मोकळा व्हावा यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मनसे नेते राज ठाकरे आणि निर्माता,दिग्दर्शक करण जोहर यांची भेट घेतली यावर शबाना आझमींनी आपल्या ट्विटमधून टीका केलीय. शबाना आझमी म्हणतात की, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सिनेमाला सुरक्षा द्यायचं नक्की केलं असताना मुख्यमंत्र्यांना नंतर मध्यस्थी करायची गरजच काय होती?

उरी हल्ल्यानंतर मनसेनं 'ऐ दिल है मुश्किल' सिनेमावर बंदी घातली होती. सिनेमात पाकिस्तान कलाकार फवाद खान असल्यानं सिनेमा चालू देणार नाही, असं बजावलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबरोबरच्या भेटीनंतर, सिनेमात पाकिस्तानी कलाकार घेतल्यास निर्मात्यांनी 5 कोटींचा दंड आर्मी वेलफेअर फंडाला द्यावा, असं राज ठाकरेंनी सांगितलं आणि करण जोहरनं ते मान्य केलं.

मी देशभक्त आहे की नाही ते मनसे ठरवणार का? मी देशाच्या घटनेशी बांधील आहे, राज ठाकरेंशी नाही, असं ही त्या म्हणाल्या आहेत.

याशिवाय एका कार्यक्रमातही त्यांनी मनसेवर टीका केलीय. त्या म्हणाल्या की, मनसे सिनेमा बघून मजा घेण्यापेक्षा सिनेमाला लक्ष्य करून जास्त मजा घेतेय. भारतानं पाकिस्तानासोबतचे राजनैतिक संबंध तोडले नाहीयत, मग फक्त फिल्म इंडस्ट्रीलाच का लक्ष्य केलं जातंय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2016 01:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close