S M L

अहमदनगरमध्ये बहुजन क्रांती मोर्चा

Sachin Salve | Updated On: Oct 24, 2016 04:30 PM IST

अहमदनगरमध्ये बहुजन क्रांती मोर्चा

24 ऑक्टोबर : मराठा क्रांती मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर दलित समाजही रस्त्यावर उतरला आहे. ठाणे, रायगड आणि पालघरनंतर आज अहमदनगरमध्येही बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी लाखोंच्या संख्येनं दलित बांधव एकत्र आले होते.

अहमदनगरमध्ये आज बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ऍट्रॉसिटीची कायद्या अधिक कडक करावा आणि या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र न्यायालय असावं, महिलांवर अत्याचार थांबविण्यासाठी कडक कायदा करावा, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी द्यावी. अशा वेगवेगळ्या 11 मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. वाडिया पार्कवर काही नेत्यांची भाषणं पार पडली. यानंतर दलित समाजातील पीडित कुटुंबीयांच्या वतीनं जिल्हाधिका•यांना निवेदन देऊन आणि संविधानाचं रक्षण करण्याची शपथ घेऊन या मोर्चाची सांगता करण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 24, 2016 04:30 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close