S M L

मला उंचीची भीती वाटते- अजय देवगण

Samruddha Bhambure | Updated On: Oct 25, 2016 01:19 PM IST

मला उंचीची भीती वाटते- अजय देवगण

25 ऑक्टोबर: प्रत्येकाला भीती वाटत असते, मलाही वाटते. माझी पहिली भीती आहे ती जवळची माणसं मला सोडून जातील ही, तर दुसरी भीती आहे उंचीची, 'शिवाय'च्या निमित्तानं अजय देवगण मीडियाशी संवाद साधत होता. अजयचं पहिलं दिग्दर्शन असलेला 'शिवाय' 28 ऑक्टोबरला रिलीज होतोय.

'शिवाय'मध्ये अजय मुख्य भूमिकेत तर आहेच, पण याशिवाय तो सिनेमाचा सहनिर्माताही आहे. 'शिवाय'मधून प्रेक्षकांना अजयच्या दिग्दर्शनाची चुणूकही दिसणारेय.

सिनेमाबद्दल बोलताना अजय देवगण म्हणाला की, सिनेमा संवेदनशील आहे. हा सिनेमा वडील आणि मुलीच्या नात्यावर आहे. त्यांच्यातल्या प्रेमाच्या धाग्यावर आहे.प्रेक्षक हा सिनेमा पाहताना भावनिक होऊन जातील.

'शिवाय' हा ॲक्शन थ्रिलर आहे. 'ऐ दिल है मुश्किल' आणि 'शिवाय' एकाच दिवशी रिलीज होतायत. सिनेमात सायशा सहगल ही नवी अभिनेत्रीही आहे. याशिवाय वीर दास, गिरीश कर्नाड यांच्या भूमिका आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 25, 2016 01:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close