S M L

शिवस्मारकासाठी 3600 कोटींच्या प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी

Samruddha Bhambure | Updated On: Oct 26, 2016 12:55 PM IST

123724-shivsmarak

26 ऑक्टोबर :  अरबी समुदातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी 3 हजार 600 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. आचारसंहितेतही निवडणूक आयोगाच्या परवानगीने निधी मंजूर केला जाईल, अशी माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली.

निवडणूक आयोगाकडून परवानगी मिळाल्यास टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचे उद्धाटन करण्यात येईल, असं विनायक मेटे यांनी सांगितलं आहे. शिवस्मारक प्रकल्पासाठी लागणार निधी राज्य सरकारकडून उपलब्ध केला जाणार असून, यातील काही प्रमाणात निधी केंद सरकारकडून मिळणार असल्याचेही मेटेंनी सांगितलं आहे.

या प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांत होणार आहे. 2019 पर्यंत पहिला टप्पा पूर्ण होईल. यामध्ये शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा समावेश असेल, तर दुसर्‍या टप्प्यात आर्ट गॅलरी, संग्रहालय, गड-किल्ल्यांचा देखावा, शिवचरित्र अशा अनेक बाबींचा समावेश असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2016 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close