S M L

मिठागराच्या जमिनी भूमाफियांच्या घशात घालू नका, सेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2016 05:09 PM IST

मिठागराच्या जमिनी भूमाफियांच्या घशात घालू नका, सेनेचं मुख्यमंत्र्यांना पत्र

26 ऑक्टोबर : मिठागरांच्या जमिनीवरून सेना-भाजप आमने-सामने आलेत. मिठागराच्या जमिनीच्या विक्रीला शिवसेनेचे माजी महापौर सुनील प्रभू यांनी विरोध केलाय. मिठागराच्या जमिनी भूमाफियांच्या घशात घालू नका अशा आशयाचं एक पत्रच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलंय.

आमदार सुनिल प्रभू यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहुन खारफुटीच्या जमिनीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. स्वस्त घरांसाठी आता खारफुटीच्या जमिनीवर आक्रमण सुरू आहे. याला सेनेनं विरोध केलाय. या जमिनी भूमाफियांच्या घशात घालण्यासाठी सरकारमधीलच काही जण कार्यरत असल्याचा आरोपही या पत्राद्वारे प्रभू यांनी केलाय. यामागे केंद्रातील बडे भाजप नेते आणि बिल्डर जबाबदार असल्याचं सेनेचं म्हणणं आहे. तसंच आदित्य ठाकरे यांनीही सुनिल प्रभू यांचं पत्र ट्विटरवर टॅग केलंय. सेना-भाजपमध्ये आता खारजमिनीवरूनही वाद सुरू होतो की काय अशी चिन्ह या पत्रानंतर दिसायला लागलीत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2016 05:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close