S M L

अफगाण 'मोनालिसा'ला पाकिस्तानात अटक

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2016 06:55 PM IST

अफगाण 'मोनालिसा'ला पाकिस्तानात अटक

sharbat_gula26 ऑक्टोबर : नॅशनल जिऑग्राफिकची जगप्रसिद्ध 'अफगाणी मुलगी' शरबत बिबीला पाकिस्तानात अटक करण्यात आलीय. शरबत बिबीला पेशावरमध्ये पाकिस्तानी फेडरल इनव्हेस्टिगेशन एजन्सीने अटक केली. तिच्याकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांचं नागरिकत्व असलेलं आयकार्ड सापडलं. ही दोन्ही आयकार्ड्स तिच्याकडून जप्त करण्यात आलीयत. शरबत बिबीवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे.

नॅशनल जिऑग्राफिकचे छायाचित्रकार स्टीव्ह मॅक्युरी यांनी 1984 मध्ये या अफगाण मुलीचा फोटो घेतला होता. पेशावरजवळच्या निर्वासित छावणीमध्ये राहणारी ही अफगाणी मुलगी तेव्हा 12 वर्षांची होती. सोव्हिएट रशियाने अफगाणिस्तानवर कब्जा मिळलेला असतानाचा तो काळ होता. अफगाणिस्तानमधल्या युद्धात निर्वासित छावण्यांमध्ये तिथले नागरिक कसे दिवस कंठतायत याबद्दलचा हा रिपोर्ट नॅशनल जिओग्राफिकमध्ये आला आणि ही मुलगी अफगाणिस्तान युद्धाचा चेहरा बनली. 1985 च्या नॅशनल जिऑग्राफिकच्या मुखपृष्ठावर शरबत गुलाचा हा फोटो झळकला आणि हृदयाचा ठाव घेणारी हिरव्या डोळ्यांची ही शरबत गुला जगप्रसिद्ध झाली. या फोटोला त्यांनी 'अफगाणिस्तानची मोनालिसा' असं शीर्षक दिलं.

शरबत गुला ही पश्तुन मुलगी आहे. अफगाणिस्तानमध्ये रशियाने केलेल्या बॉम्बहल्ल्यांमध्ये शरबत गुलाचे आईवडील मारले गेले. शरबत तिचा एक भाऊ, 3 बहिणी आणि आजीसोबत मजल दरमजल करत पाकिस्तानला आली आणि नसीर बागच्या निर्वासित छावणीमध्ये राहू लागली. तिथेच स्टीव मॅक्युरी यांनी तिचा फोटो काढला. नॅशनल जिओग्राफिकने या मुलीच्या आयुष्यावर एक डॉक्युमेंटरीही केली होती.

हा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक वर्षं शरबत गुला पुन्हा विस्मृतीत गेली होती. पण नॅशनल जिऑग्राफिकचे छायाचित्रकार स्टीव्ह मॅक्युरी यांची चिकाटी एवढी की, 2002 मध्ये त्यांनी तिला पुन्हा शोधून काढलं. 2002 मध्ये 17 वर्षांनतर स्टीव्ह मॅक्युरी पुन्हा एकदा पाकिस्तानातल्या नासीर बागच्या निर्वासित छावणीमध्य गेले तेव्हा त्यांनी शरबत गुलाचा शोध घेतला. तिच्या भावाच्या मित्रामार्फत ते तिच्यापर्यंत पोहोचले. पुन्हा एकदा त्यांना जेव्हा ही शरबत गुला भेटली तेव्हा ती 29 वर्षांची होती.

त्यावेळची 12 वर्षांची लहानगी शरबत गुला शरबत बिबी झाली होती पण बदलले नव्हते ते तिचे डोळे. त्यामुळेच शरबत बिबीचा फोटो काढल्यानंतर ही तीच मुलगी आहे याची स्टीव्ह मॅक्युरी यांना खात्री पटली.शरबत बिबीवर नॅशनल जिऑग्राफिकने केलेला हा रिपोर्टही जगभरात खूपच गाजला आणि शरबत बिबी पुन्हा प्रसिद्ध झाली. आता मात्र याच शरबत बिबीवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. तिच्याकडे दोन देशांचं नागरिकत्व आढळल्यामुळे ती संशयाच्या घे•यात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2016 06:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close