S M L

भाजपला मिळाला आणखी एक मित्रपक्ष, विनय कोरेंचा जनसुराज्य पक्ष महायुतीत सामिल

Sachin Salve | Updated On: Oct 26, 2016 09:15 PM IST

भाजपला मिळाला आणखी एक मित्रपक्ष, विनय कोरेंचा जनसुराज्य पक्ष महायुतीत सामिल

26 ऑक्टोबर : नगरपरिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला एका नव्या मित्रपक्षाची साथ मिळाली आहे. जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे आज भाजपच्या आघाडीमध्ये सामिल झाले आहे. कोरे यांनी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपण भाजपसोबत येत असल्याचं सांगितलं. यावेळी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते.

कोरे हे सहकारक्षेत्रातलं पश्चिम महाराष्ट्रातलं बडं प्रस्थ आहे. त्यामुळे भाजपला फायदा होण्याची शक्यता आहे. नगर परिषद आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जनसुराज्य आणि भाजप एकत्र लढणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. तर कुठलीही अट न घालता केवळ विकासाच्या मुद्यावर आपण भाजप सोबत आल्याचं विनय कोरे यांनी स्पष्ट केलं.

विनय कोरे यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती आणि ते निवडून ही आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीसोबत त्यांचं संबंध फारसे टिकले नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत 2004 मध्ये जनसुराज्य पक्ष स्थापन केला होता. विनय कोरे यांच्या गोकूळ दूध समुहाच्या माध्यमातून कोल्हापुरासह पश्चिम महाराष्ट्रात आपले प्रस्थ निर्माण केले. त्याचा फायदा त्यांच्या जनसुराज्य पक्षाला झाला. त्यांच्या पक्षाने पहिल्या विधानसभा निवडणुकीत 4 आमदार निवडून आले होते. विनय कोरे यांनी कॅबिनेट मंत्रिमंडळातही पद भूषवले होते. पण जनसुराज्य पक्षाला लवकरच उतरली कळा लागली होती. आता नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत विनय कोरे यांनी भाजपात सामिल झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2016 09:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close