S M L

महापौर बंगला खातोय धूळ

प्राची कुलकर्णी, पुणे28 एप्रिलतब्बल दीड कोटी रुपये खर्चून पुण्याच्या महापौरांसाठी महापालिकेने बांधलेला महापौर बंगला सध्या धूळ खात पडला आहे. आत्तापर्यंत या बंगल्यात एकच महापौर राहिल्या आहेत. महापालिका कशासाठी हा पांढरा हत्ती पोसतेय, असा सवाल आता पुणेकर आणि स्वयंसेवी संस्था विचारत आहेत.पुण्यातील घोले रोडवर हे महापौरांचे निवासस्थान आहे. पण त्यात महापौर राहत नाहीत. ते रास्ता पेठेतील त्यांच्या घरातच राहणे पसंत करतात. महापौरांना जर हे घर नको असेल, तर त्याचा वापर इतर विधायक कामांसाठी व्हावा, अशी मागणी क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या संदीप खर्डेकर यांनी केली आहे.दीप्ती चौधरी महापौर असताना तब्बल दीड कोटी रुपये खर्च करुन हा बंगला बांधण्यात आला. बंगल्याच्या उद्घाटनानंतर दीप्ती चौधरी तीन महिने त्यात राहिल्या. पण नंतर रजनी त्रिभुवन असोत की राजलक्ष्मी भोसले, गेल्या पाच वर्षांत हे निवासस्थान कुणीच वापरले नाही. सध्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी मात्र हे निवासस्थान वापरले जात असल्याचा दावा केला आहे. पण नागरिकांचा पैसा पालिका असा कसा वाया घालवू शकते असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत. या बंगल्यामध्ये सध्या सुरक्षा रक्षक आणि कामगार यांचा ताफा तैनात आहे. विकास कामांसाठी पैसे नसल्याचे कारण देणारी पालिका या बंगल्याच्या मेन्टेनन्ससाठी मात्र तब्बल अडीच लाख रुपयांचा खर्च करत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 28, 2010 03:24 PM IST

महापौर बंगला खातोय धूळ

प्राची कुलकर्णी, पुणे

28 एप्रिल

तब्बल दीड कोटी रुपये खर्चून पुण्याच्या महापौरांसाठी महापालिकेने बांधलेला महापौर बंगला सध्या धूळ खात पडला आहे.

आत्तापर्यंत या बंगल्यात एकच महापौर राहिल्या आहेत. महापालिका कशासाठी हा पांढरा हत्ती पोसतेय, असा सवाल आता पुणेकर आणि स्वयंसेवी संस्था विचारत आहेत.

पुण्यातील घोले रोडवर हे महापौरांचे निवासस्थान आहे. पण त्यात महापौर राहत नाहीत. ते रास्ता पेठेतील त्यांच्या घरातच राहणे पसंत करतात. महापौरांना जर हे घर नको असेल, तर त्याचा वापर इतर विधायक कामांसाठी व्हावा, अशी मागणी क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या संदीप खर्डेकर यांनी केली आहे.

दीप्ती चौधरी महापौर असताना तब्बल दीड कोटी रुपये खर्च करुन हा बंगला बांधण्यात आला. बंगल्याच्या उद्घाटनानंतर दीप्ती चौधरी तीन महिने त्यात राहिल्या. पण नंतर रजनी त्रिभुवन असोत की राजलक्ष्मी भोसले, गेल्या पाच वर्षांत हे निवासस्थान कुणीच वापरले नाही.

सध्याचे महापौर मोहनसिंग राजपाल यांनी मात्र हे निवासस्थान वापरले जात असल्याचा दावा केला आहे. पण नागरिकांचा पैसा पालिका असा कसा वाया घालवू शकते असा प्रश्न नागरिक उपस्थित करतायत.

या बंगल्यामध्ये सध्या सुरक्षा रक्षक आणि कामगार यांचा ताफा तैनात आहे. विकास कामांसाठी पैसे नसल्याचे कारण देणारी पालिका या बंगल्याच्या मेन्टेनन्ससाठी मात्र तब्बल अडीच लाख रुपयांचा खर्च करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2010 03:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close