S M L

तुकाराम मुंढेंना पाठीशी घातलं तर राजीनामा देईन -सुधाकर सोनावणे

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2016 06:48 PM IST

तुकाराम मुंढेंना पाठीशी घातलं तर राजीनामा देईन -सुधाकर सोनावणे

27 ऑक्टोबर : नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर सुधाकर सोनवणे यांच्यातला वाद शिगेला पोहचला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त मुंढेंची पाठराखण केली. त्यामुळे महापौर सुधाकर सोनावणे कमालीचे नाराज झालेत. सीएम मुंढेना पाठिशी घालत असतील तर मी राजीनामा देऊन असा इशारा महापौरांनी दिलाय..

नवी मुंबई महापलिकेत सर्वपक्षियांनी तुकाराम मुंढेंच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव मंजूर केला. या ठरावानंतर तुकाराम मुंढे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव प्रविण दीक्षित यांची भेट घेऊन आपली भूमिका मांडली. मुख्यमंत्री अविश्वसादर्शक ठराव फेटाळली अशी शक्यता निर्माण झालीये.

त्यामुळे आता नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनावणे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत राजीनामास्त्र उपसले आहे. मुख्यमंत्र्यांनी जनमताचा आदर करावा. तुकाराम मुंढे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नये जर असे काही झाल्यास आमच्या मताला किंमत राहणार नाही. त्यामुळे वेळ आली तर महापौरपदाचा राजीनामा देईन असा इशाराच सोनावणे यांनी दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2016 06:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close