S M L

सेना-भाजपची दिवाळी गोड, नगरपालिका एकत्र लढणार

Sachin Salve | Updated On: Oct 27, 2016 08:59 PM IST

सेना-भाजपची दिवाळी गोड, नगरपालिका एकत्र लढणार

मुंबई, 27 ऑक्टोबर : 'ना आमच्या मतमेद आहे ना आमच्यात मनभेद आहेत' अशी ग्वाही देत स्थानिक स्वराज्य निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आता एकत्र 'फटाके' फोडणार आहे. नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना भाजपच्या युतीची घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केलीये.

युती तोडण्यावरून एकमेकांना पाण्यात पाहणा-या शिवसेना आणि भाजपमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा दिलजमाई झालीये. 192 नगरपरिषद आणि 20 नगरपंचायत निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने स्थानिक पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय जाहीर केला. राष्ट्रवादीच्या निर्णयानंतर शिवसेना आणि भाजपच्या गोटात हालचालींना आज अचानक वेग आला. या युतीबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली. तसंच शिवसेना खासदार विनायक राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात बैठकही झाली.

अपेक्षेप्रमाणे संध्याकाळी सेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्ण घेतलाय. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी एकत्रिपणे सामोर जाणार आहोत असं राऊत यांनी जाहीर केलं.

तसंच एकमेकांवर टिकेचा विषय संपलाय, आमच्या कोणतेही मतभेद नाही. स्थानिक पातळीवर काही वाद उफळलाच तर त्या वादावर दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन तोडगा काढतील असंही राऊतांनी स्पष्ट केलं. युतीच्या निर्णयावर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री दोघेही खूश आहेत अशी माहितीही संजय राऊतांनी यावेळी दिली.

तर 212 नगरपरिषदांमध्ये भाजपा-सेना एकत्र निवडणुका लढणार आहे. सर्व जिल्हा अध्यक्षांना युतीचा निर्णय कळवला आहे. ही चांगली सुरुवात असून या निवडणुकीत आम्हीच जिंकू असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 27, 2016 08:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close