S M L

औरंगाबादवर सेनेचा भगवा

29 एप्रिलअखेर शिवसेनेने औरंगाबादचा गड राखला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदी आज शिवसेनेच्या अनिता घोडेले निवडून आल्या. तर उपमहापौरपदी भाजपचे प्रशांत देसरडा निवडले गेले.घोडेले यांनी काँग्रेस आघाडीच्या रेखा जैस्वालवर यांच्यावर मात केली. महापौरपदासाठी काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. पण सेनेच्या चंद्रकांत खैरेंना गड राखण्यात यश मिळवले. घोडेलेंना 51 तर जैस्वालांना 47 मते पडली. तर मनसे या मतदानात तटस्थ राहिली.उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे प्रशांत देसरडा विजयी झाले. त्यांना 51 मते पडली. त्यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार शेख ख्वाजा शरफुद्दिन यांचा पराभव केला. शेख यांना 47 मते पडली. त्यामुळे उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही काँग्रेस आघाडीच्या पदरी निराशाच आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 09:33 AM IST

औरंगाबादवर सेनेचा भगवा

29 एप्रिल

अखेर शिवसेनेने औरंगाबादचा गड राखला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या महापौरपदी आज शिवसेनेच्या अनिता घोडेले निवडून आल्या. तर उपमहापौरपदी भाजपचे प्रशांत देसरडा निवडले गेले.

घोडेले यांनी काँग्रेस आघाडीच्या रेखा जैस्वालवर यांच्यावर मात केली. महापौरपदासाठी काँग्रेसच्या मातब्बर नेत्यांनी फिल्डिंग लावली होती. पण सेनेच्या चंद्रकांत खैरेंना गड राखण्यात यश मिळवले.

घोडेलेंना 51 तर जैस्वालांना 47 मते पडली. तर मनसे या मतदानात तटस्थ राहिली.

उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे प्रशांत देसरडा विजयी झाले. त्यांना 51 मते पडली. त्यांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार शेख ख्वाजा शरफुद्दिन यांचा पराभव केला.

शेख यांना 47 मते पडली. त्यामुळे उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही काँग्रेस आघाडीच्या पदरी निराशाच आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close