S M L

तारपाच्या ठेक्यावर डान्स डे साजरा

शिल्पा गाड, मुंबई29 एप्रिलआज डान्स डे आहे... तालावर थिरकण्याचा हा दिवस...पण वारली आदिवासींसाठी असा कोणताही दिवस डान्स डे नसतो... तर तारपाच्या नादात ते दिवसरात्र घुमत असतात. आणि त्यांचा हाच नाद आणि ताल आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत, मुंबईतील काही तरुण-तरुणी...बीएच्या दुसर्‍या वर्षात शिकणार्‍या तेजसने वेस्टर्न डान्समध्ये मास्टरी मिळवली आहे. पण तारपाचा नाद लागला आहे. तो स्ध्या वारली आदिवासींचे तारपा नृत्य शिकतो आहे. ठाण्यातील लोकरंग सांस्कृतिक कलामंचच्या लोककला प्रशिक्षण शिबिरात हे तारपा आणि काठीच्या ठेक्यावरील खास पारंपरिक पद्धतीचे नृत्य शिकवले जाते. चिमप्पा गावाल्या पाड्यावरच्या प्रमाणे इथेही तारपा वाजवतात. नेहमीच्या रेकॉर्ड डान्सवर नाचण्यापेक्षा तारप्याच्या तालावर नाचण्याचा अनुभव खूप विलक्षण असतो. त्यामुळे मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात आम्हाला विरंगुळा मिळतो, असे या शिबिरात सहभागी झालेले तरुण सांगतात. सुप्रसिद्ध फ्रेंच नर्तक आणि बॅलेमास्टर जीन जॉर्ज नोवरे यांच्या जन्मदिनानिमित्त 29 एप्रिल हा दिवस नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 11:15 AM IST

तारपाच्या ठेक्यावर डान्स डे साजरा

शिल्पा गाड, मुंबई

29 एप्रिल

आज डान्स डे आहे... तालावर थिरकण्याचा हा दिवस...पण वारली आदिवासींसाठी असा कोणताही दिवस डान्स डे नसतो... तर तारपाच्या नादात ते दिवसरात्र घुमत असतात. आणि त्यांचा हाच नाद आणि ताल आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत, मुंबईतील काही तरुण-तरुणी...

बीएच्या दुसर्‍या वर्षात शिकणार्‍या तेजसने वेस्टर्न डान्समध्ये मास्टरी मिळवली आहे. पण तारपाचा नाद लागला आहे. तो स्ध्या वारली आदिवासींचे तारपा नृत्य शिकतो आहे.

ठाण्यातील लोकरंग सांस्कृतिक कलामंचच्या लोककला प्रशिक्षण शिबिरात हे तारपा आणि काठीच्या ठेक्यावरील खास पारंपरिक पद्धतीचे नृत्य शिकवले जाते. चिमप्पा गावाल्या पाड्यावरच्या प्रमाणे इथेही तारपा वाजवतात.

नेहमीच्या रेकॉर्ड डान्सवर नाचण्यापेक्षा तारप्याच्या तालावर नाचण्याचा अनुभव खूप विलक्षण असतो. त्यामुळे मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात आम्हाला विरंगुळा मिळतो, असे या शिबिरात सहभागी झालेले तरुण सांगतात.

सुप्रसिद्ध फ्रेंच नर्तक आणि बॅलेमास्टर जीन जॉर्ज नोवरे यांच्या जन्मदिनानिमित्त 29 एप्रिल हा दिवस नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close