S M L

औरंगाबादमध्ये फटाका मार्केट बेचिराख

Sachin Salve | Updated On: Oct 29, 2016 01:52 PM IST

औरंगाबादमध्ये फटाका मार्केट बेचिराख

29 ऑक्टोबर : औरंगाबादमध्ये फटाका मार्केटला भीषण आग लागलीये. या आगीत जवळपास 150 फटाक्यांची दुकानं जळून भस्मसात झालीत. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. मात्र, या आगीत दीड ते दोन कोटींचं नुकसान झालंय.

औरंगाबाद शहरातील गजबजलेल्या मध्यभागी असलेल्या जिल्हा परिषद मैदानावर दरवर्षीप्रमाणे फटाके मार्केट भरवण्यात येतो. यंदा मोठ्या उत्साहाने फटाका मार्केट स्टॉल सजवण्यात आले. मात्र, आज औरंगाबादकरांच्या दिवाळीला गालबोट लागले. फटाका मार्केटला अचानक आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. फटाक्यांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला. अवघ्या काही तासांत 150 फटाक्यांची दुकानं जळून भस्मसात झाली. या आगीत अनेक वाहनं आगीच्या भक्षस्थानी पडलीत. परिसरात धुराचे मोठे लोट दूरहुन दिसत होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आग्निशमन दलाला यश आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 29, 2016 01:31 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close