S M L

आठवणी गौरवशाली इतिहासाच्या

विनोद तळेकर, मुंबई29 एप्रिलसंयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतलेल्यांपैकी अनेक जण आजही हयात आहेत. त्या काळच्या आठवणी त्यांच्या मनात आजही ताज्या आहेत. आपल्या आयुष्याची बाजी खेळून महाराष्ट्राचा मंगलमय कलश आणलेल्यांच्या कार्याची माहिती आजच्या पिढीला नाही. हीच खंत आजही या वीरांच्या मनात आहे. राज्य सरकारनेही या चालत्या बोलत्या इतिहासाची अजून दखल घेतली नाही.आपल्या खणखणीत आवाजाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील वातावरण भारून टाकले होते, केशरबाई जैनू चाँद यांनी. शाहीर अमर शेख यांच्या कलापथकातून संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्तीसंग्रामात त्या आघाडीवर होत्या. केशरबाईंचा आवाज आजही त्या भारलेल्या वातावरणाची आठवण करून देतो. घरी आलेल्या प्रत्येकाला त्या आठवणी सांगताना केशरबाई भूतकाळात हरवून जातात. पण आपल्या पिढीने केलेल्या त्यागाचा विसर खूप लवकर आजच्या पिढीला पडलाय ही त्यांची खरी व्यथा आहे. आम्ही लढून मिळवलेल्या महाराष्ट्रातले राज्यकर्तेही आपल्याला विसरले या जाणीवेनेही त्या दुखावल्यात.जी कथा केशरबाईंची तीच राजा आजगावकरांचीही. संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनीही गोळ्या झेलल्या.दोन वर्षांपूर्वी मुंबईत राज्य सरकारतर्फे हयात असलेल्या आंदोलकांचा सत्कार केला गेला. पण त्यात आजगावकरांचा मात्र सरकारला विसर पडला.सरकारने उपेक्षा केल्याचं दु:ख निश्चितच या लढवय्यांना आहे. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने तरी सरकार या लढवय्यांना हक्काचा मान देणार का हा खरा प्रश्न आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 12:00 PM IST

आठवणी गौरवशाली इतिहासाच्या

विनोद तळेकर, मुंबई

29 एप्रिल

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतलेल्यांपैकी अनेक जण आजही हयात आहेत. त्या काळच्या आठवणी त्यांच्या मनात आजही ताज्या आहेत.

आपल्या आयुष्याची बाजी खेळून महाराष्ट्राचा मंगलमय कलश आणलेल्यांच्या कार्याची माहिती आजच्या पिढीला नाही. हीच खंत आजही या वीरांच्या मनात आहे. राज्य सरकारनेही या चालत्या बोलत्या इतिहासाची अजून दखल घेतली नाही.

आपल्या खणखणीत आवाजाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील वातावरण भारून टाकले होते, केशरबाई जैनू चाँद यांनी. शाहीर अमर शेख यांच्या कलापथकातून संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्तीसंग्रामात त्या आघाडीवर होत्या.

केशरबाईंचा आवाज आजही त्या भारलेल्या वातावरणाची आठवण करून देतो. घरी आलेल्या प्रत्येकाला त्या आठवणी सांगताना केशरबाई भूतकाळात हरवून जातात. पण आपल्या पिढीने केलेल्या त्यागाचा विसर खूप लवकर आजच्या पिढीला पडलाय ही त्यांची खरी व्यथा आहे.

आम्ही लढून मिळवलेल्या महाराष्ट्रातले राज्यकर्तेही आपल्याला विसरले या जाणीवेनेही त्या दुखावल्यात.जी कथा केशरबाईंची तीच राजा आजगावकरांचीही. संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनीही गोळ्या झेलल्या.

दोन वर्षांपूर्वी मुंबईत राज्य सरकारतर्फे हयात असलेल्या आंदोलकांचा सत्कार केला गेला. पण त्यात आजगावकरांचा मात्र सरकारला विसर पडला.

सरकारने उपेक्षा केल्याचं दु:ख निश्चितच या लढवय्यांना आहे. सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने तरी सरकार या लढवय्यांना हक्काचा मान देणार का हा खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 12:00 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close