S M L

संयुक्त राष्ट्रसंघाने प्रथमच साजरी केली दिवाळी

Samruddha Bhambure | Updated On: Oct 30, 2016 03:41 PM IST

संयुक्त राष्ट्रसंघाने प्रथमच साजरी केली दिवाळी

30 ऑक्टोबर : भारतात सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरू असताना सातासमुद्रापार संयुक्त राष्ट्रसंघातही दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचं न्यूयॉर्क येथील मुख्यालय प्रथमच दिवाळीनिमित्त रोषणाईने उजळून निघालं असून भारताने त्याबद्दल या सर्वोच्च संघटनेला धन्यवाद दिले आहेत.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयावर निळ्या रंगाची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. त्यावर दिवा आणि 'हॅप्पी दिवाली' असा संदेश देण्यात आला आहे. जगातील सर्व देशांच्या एका प्रमुख संघटनेने अशाप्रकारे शुभेच्छा देऊन भारतीय सणाचा गौरव केल्याने भारतीयांसाठी ती अभिमानाची बाब ठरली आहे.

संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे प्रतिनिधी आणि राजदूत सय्यद अकबरुद्दीन यांनी या रोषणाईचा फोटो ट्विट करत संयुक्त राष्ट्रसंघाचे आभार मानले आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ प्रथमच दिवाळी साजरी करत आहे. त्याबद्दल धन्यवाद, असे ट्विट अकबरुद्दीन यांनी केले आहे.

दरम्यान, याआधी २०१४मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने दिवाळीदिवशी 'नॉन मीटिंग डे' जाहीर केला होता. त्यादिवशी कोणताही प्रस्ताव महासभेने स्वीकारला नव्हता. पूर्णवेळ कामकाज बंद ठेऊन दिवाळी साजरी करण्यात आली होती.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2016 11:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close