S M L

शहीद नितीन कोळी यांना अखेरचा निरोप

Samruddha Bhambure | Updated On: Oct 31, 2016 02:17 PM IST

शहीद नितीन कोळी यांना अखेरचा निरोप

koli Funeral

31 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीरमध्ये प्रत्यक्ष ताबारेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात शहीद झालेले सांगलीचे सुपुत्र नितीन सुभाष कोळी यांना आज (सोमवारी) अखेरचा निरोप देण्यात आला. नितीन यांच्या मूळगावी दुधगाव इथं, वारणा नदीच्या काठावर त्यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले

सुरुवातीला नितीन यांचं पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आलं आणि नंतर कर्मवीर चौकात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. तिथून त्यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी 'नितीन कोळी अमर रहे... अमर रहे...'च्या घोषणा गावात घुमल्या. नितीन कोळींचे भाऊ आणि मोठा मुलगा यांनी त्यांना मुखाग्नी दिली. या अंत्यसंस्कारांवेळी राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सदाभाऊ खोत, राजू शेट्टी उपस्थित होते.

दरम्यान, ‍कोळी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे 15 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2016 01:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close