S M L

चंद्रपुरातील पूर्ती बाजारला भीषण आग, संपूर्ण इमारत जळून खाक

Samruddha Bhambure | Updated On: Oct 31, 2016 12:53 PM IST

चंद्रपुरातील पूर्ती बाजारला भीषण आग, संपूर्ण इमारत जळून खाक

31 ऑक्टोबर : चंद्रपूरमधील जटपूरा गेटजवळील एका इमारतीमध्ये रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली.  या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीमुळे संपूर्ण इमारत जळून खाक झाली आहे. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

रविवारी पाहाटे तीनच्या सुमारास इमारतीमध्ये भीषण आग लागली. अवघ्या काही वेळातच ही आग झपाट्याने पसरत गेली आणि संपूर्ण इमारतीमध्ये अक्षरशः अग्नितांडव सुरू झालं. सकाळपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.

दरम्यान, पालमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील घटनास्थळी भेट दिली असून या घटनेची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या आगीत कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून याची चौकशी सुरु असल्याचे अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2016 10:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close