S M L

मुंबईतील डोमेस्टिक विमानतळ दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत ब्लॉक

Samruddha Bhambure | Updated On: Oct 31, 2016 04:47 PM IST

मुंबईतील डोमेस्टिक विमानतळ दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत ब्लॉक

31 ऑक्टोबर : जर तुम्ही आज दुपारी मुंबई एअरपोर्टवरून प्रवासाचे तिकीट बुक केलं असेल तर एअरपोर्टवर पोहोचण्याआधी फ्लाइटचे स्टेटस अवश्य पाहा. मुंबई विमानतळ आज 5 तासांसाठी बंद राहणार आहे. रनवेच्या मेंटनन्सच्या कामांसाठी आज दुपारी 12 ते सायंकाळी 5 पर्यंत हा ब्लॉक राहणार आहे. याविषयी एअरलाइन्स कंपन्या आणि वैमानिकांना आधीच सूचना देण्यात आल्या आहेत.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन रन-वे वरून विमान वाहतूक केली जाते. दोन्ही रन-वेच्या मेंटनन्ससाठी तासांसाठी दोन्ही रन-वे वरील वाहतूक बंद केली जात आहे.या ब्लॉकचा 1600 फ्लाइट्सवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये देशांतर्गत विमानांची संख्या अधिक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 31, 2016 03:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close