S M L

'मुश्किल' सामना पार करून जिंकलं प्रेक्षकांचं 'दिल'

Sachin Salve | Updated On: Nov 3, 2016 05:47 PM IST

'मुश्किल' सामना पार करून जिंकलं प्रेक्षकांचं 'दिल'

3नोव्हेंबर: रिलीजआधी आणि रिलीजनंतर भरपूर चर्चेत असलेला 'ऐ दिल है मुश्किल' बॉक्स ऑफिसवर 100कोटींची कमाई केलीय.रिलीजआधी सिनेमा थिएटर्समध्ये येणं मुश्किल होऊन बसलं होतं..आणि रिलीजनंतरही सिनेमाबद्दल संमिश्‌्ा्र प्रतिक्रिया येत होत्या. तरीही सिनेमानं देशभरातून कमाई केलीय 74.01 कोटी रुपये.आणि परदेशातून सिनेमाला मिळालेत 70लाख डॉलर्स म्हणजेच 47 कोटी रुपये.

फॉक्स स्टुडिओच्या म्हणण्याप्रमाणे मार्केटिंग आणि वितरणाचा खर्च धरून सिनेमा 100कोटींपर्यंत गेला होता.सिनेमानं म्युझिक,सॅटेलाइट,डिजिटल वितरणातून 75 कोटी रुपये मिळवले.

धर्मा प्रॉडक्शनसाठी हे मोठं यश आहे. याच सिनेमाबरोबर रिलीज झालेल्या 'शिवाय'ची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड धीमी आहे. आतापर्यंत सिनेमानं 64.36 कोटी रुपये कमाई केलीय. 'ऐ दिल है मुश्किल'नं सर्व मुश्किलांचा सामना करून प्रेक्षकांचं दिल अखेर जिंकलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2016 05:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close