S M L

मटका-जुगार धंद्यांना कायदेशीर परवानगी द्या -रामदास आठवले

Sachin Salve | Updated On: Nov 3, 2016 08:45 PM IST

ramdas_Athavale_03 नोव्हेंबर : अनेक ठिकाणी अवैद्य धंदे सुरू आहेत. त्यात अनेक ठिकाणी तरुण काम करतात. त्यामुळे हे अवैद्य धंदे बंद केले तरी पुन्हा सुरु होतात. त्यासाठी या अवैद्य धंद्यांना सरकारने कायदेशीर परवानगी दिली पाहिजे अशी अजब मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीये.

लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये आता रामदास आठवलेंचा पुतळाही ठेवला जाणार आहे. या कार्यक्रमासाठी लोणावळ्याला आले असता त्यांनी मराठा मोर्चाबाबत आपलं मत व्यक्त केलं. सध्या मराठा समाज 50 टक्के आरक्षणाची मागणी करतोय. मात्र तशी तरतूदच अस्तित्वात नसल्याने आता त्यांना कोर्टचं आता काय ते उत्तर देईल असं त्यांनी म्हटलंय.

तसंच शिवसेना भाजप या दोन्ही पक्षामधे दुरावा निर्माण झाला होता. परंतु, आता मुख्यमंत्री यांच्याबरोबर बोलण झालं असून निवडणुकांच्यावेळी 90 टक्के युती होणार आहे. त्याचा फायदा निश्चितपणे आरपीआयला देखील होईल. मात्र आता शिवसेना भाजपा ने एकजूट दाखवून येणा•या निवडणुकीत काम करण अपेक्षित असल्याच मत अठवले यांनी मांडलं.

तसंच अनेक ठिकाणी अवैद्य धंदे सुरू आहेत. त्यात अनेक ठिकाणी तरुण काम करतात. त्यामुळे हे अवैद्य धंदे बंद केले तरी पुन्हा सुरु होतात. त्यासाठी या अवैद्य धंदयांना सरकारने कायदेशीर परवानगी दिली पाहिजे. मटका अड्डे जे ऑनलाइन पद्धतीने सुरु आहेत. त्या मटका अड्डयांना "महालॉटरी" च्या नावाने सुरू ठेवले पाहिजे अशी सुचनावजा मागणीच आठवलेंनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2016 08:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close