S M L

'IBN लोकमत'ने फोडली अन्यायाला वाचा, खामगाव प्रकरणी SITची स्थापना

Sachin Salve | Updated On: Nov 3, 2016 10:24 PM IST

'IBN लोकमत'ने फोडली अन्यायाला वाचा, खामगाव प्रकरणी SITची स्थापना

03 नोव्हेंबर : खामगाव आश्रमशाळा बलात्कार प्रकरणी आयबीएन लोकमतच्या पाठपुराव्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. या प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास केला जाणार आहे असे आदेशच पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिले आहे. या प्रकरणाचा आयपीएस श्वेता खेडकर तपास करणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तालुक्यातील नीनाजी कोकरे आश्रमशाळेत 5 आदिवासी विद्यार्थिनींवर झालेल्या बलात्कारप्रकरणी आश्रमशाळेच्या 7 कर्मचा•यांना अटक करण्यात आलीये. तर 3 जण फरार आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी आयपीएस अधिकारी श्वेता खेडकर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आलीये. आश्रमशाळेच्या 10 कर्मचा•यांवर ऍट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय. तर दुसरीकडे अत्याचार पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी शेगाव इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी आरोपींवर बलात्कार, ऍट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

कुणाकुणाला ताब्यात घेतलं होतं ?

गजानन कोकरे, आश्रमशाळेचा अध्यक्ष

पुरुषोत्तम कोकरे, संस्थेचा सचिव

आंबोरे, आश्रमशाळेचा मुख्याध्यापक

लाहूडकर, आश्रमशाळेचा कर्मचारी

गजानन भालेराव, आश्रमशाळेचा कर्मचारी

रवी डांगरे, आश्रमशाळेचा कर्मचारी

दीपक कोकरे, आश्रमशाळेचा कर्मचारी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 3, 2016 10:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close