S M L

सोरेन भाजपला शरण

29 एप्रिलझारखंडमध्ये शिबू सोरेन आता आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कपात सूचनेच्या वेळी यूपीएच्या बाजूने मतदान केल्याबद्दल सोरेन यांनी आता भाजपची माफी मागितली आहे.त्यांनी भाजप नेत्या सुषमा स्वराज यांना एक पत्र लिहिले आहे. आपली तब्बेत बरी नसल्याने आपण यूपीएच्या बाजूने मतदान केले, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.भाजपने पाठिंबा काढण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. पण भाजप मात्र आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते. भाजपचे आमदार राज्यपालांची भेट घेऊन पाठिंबा काढल्याचे पत्र देणार आहेत. यासंदर्भातच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची आज सकाळी सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी भेट झाली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 02:08 PM IST

सोरेन भाजपला शरण

29 एप्रिल

झारखंडमध्ये शिबू सोरेन आता आपले सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

कपात सूचनेच्या वेळी यूपीएच्या बाजूने मतदान केल्याबद्दल सोरेन यांनी आता भाजपची माफी मागितली आहे.

त्यांनी भाजप नेत्या सुषमा स्वराज यांना एक पत्र लिहिले आहे. आपली तब्बेत बरी नसल्याने आपण यूपीएच्या बाजूने मतदान केले, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.

भाजपने पाठिंबा काढण्याच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे. पण भाजप मात्र आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे समजते.

भाजपचे आमदार राज्यपालांची भेट घेऊन पाठिंबा काढल्याचे पत्र देणार आहेत. यासंदर्भातच भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांची आज सकाळी सुषमा स्वराज यांच्या निवासस्थानी भेट झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 02:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close