S M L

गॅस कनेक्शन जीवावर बेतलं, सिलेंडर स्फोटात आईसह 2 चिमुरड्यांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Nov 4, 2016 07:50 PM IST

गॅस कनेक्शन जीवावर बेतलं, सिलेंडर स्फोटात आईसह 2 चिमुरड्यांचा मृत्यू

नाशिक, 04 नोव्हेंबर : जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंतमध्ये पवननगर झोपडपट्टीत घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने एका महिलेसह दोघा बालकांचा हा मृत्यू झालाय. दिवाळीनिमित्त त्यांनी घरात नविन गॅस कनेक्शन घेतलं होतं. घरातील लहान मुलांनी शेगडी सुरू केल्यानं घरात गॅस पसरला आणि त्याचा स्फोट झाला.

शेगडीचं बटण सुरू होतं आणि शेजारच्या महिलेचं चुलीवर काम सुरू होतं. गॅस पसरुन त्याचा आगीशी संबंध येताच स्फोट होऊन ही दुर्घटना घडली आहे. या स्फोटात 31 वर्षांच्या मोहिनी पवार, 8 वर्षांचा कृष्णा वळवी आणि 4 वर्षांची रोहीणी शिंदे हिचा मृत्यू झालाय. ग्रामीण पोलीस याचा तपास करतायत, पण घडलेल्‌या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2016 07:36 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close