S M L

फोटोग्राफर्स मारहाण प्रकरणी 'टाटा सन्स'चा माफीनामा

Sachin Salve | Updated On: Nov 4, 2016 08:12 PM IST

फोटोग्राफर्स मारहाण प्रकरणी 'टाटा सन्स'चा माफीनामा

04 नोव्हेंबर : मुंबईत टाटा समुहाचं मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसबाहेर प्रेस फोटोग्राफर्सना मारहाण प्रकरणी टाटा समुहाने जाहीर माफी मागितलीये. झालेल्या प्रकाराबद्दल टाटा सन्स दिलगिरी व्यक्त करतो असं पत्रक टाटा समुहाने प्रसिद्ध केलंय.

सायरस मिस्त्रींच्या हकालपट्टीनंतर अचानक चर्चेत आलेला टाटा समूह आज संध्याकाळी आणखी एका घटनेने प्रकाशझोतात आला. टाटा समुहाचं मुख्यालय असणा-या बाँबे हाऊसबाहेर प्रेस फोटोग्राफर्सना सुरक्षारक्षकांनी जबर मारहाण करण्यात आलीये. या मारहाणीत तीन फोटोग्राफर्सना बेदम मारहाण करण्यात आलीये. या प्रकरणी रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीये.

दरम्यान, झालेल्या प्रकाराबद्दल टाटा सन्स समुहाने माफी मागितलीये. अंत्यत कठीण परिस्थितीत मीडियाला काम कराव लागत, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे झालेल्या प्रकारबद्दल प्रसारमाध्यमांची माफी मागतो. यापुढे असा कोणताही प्रकार घडू नये याची खबरदारी आम्ही घेऊ अशी ग्वाही देत टाटा सन्सने माफी मागितलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 4, 2016 08:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close