S M L

बुलढाणा आश्रमशाळा बलात्कार प्रकरणी आणखीन 4 जण अटकेत

Samruddha Bhambure | Updated On: Nov 5, 2016 05:57 PM IST

buldhana34

05 नोव्हेंबर :  बुलडाणा जिल्हातील कोकरे आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी पोलिसांनी आणखीन चौघांना अटक केली. त्यामुळे आत्तापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 15 वर पोहोचली आहे.

कोकरे आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आल्यानंतर कोकरे आश्रमाची कसून तपासणी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी आणखीन 4 जणांना आज पहाटे अटक केली. तसेच याप्रकरणी 17 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, या आश्रमशाळेतील आणखीन सहा मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, या सर्व मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच यावरची सद्यस्थिती पाहायला मिळू शकते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 5, 2016 03:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close