S M L

पेणमधील स्टेडियमचे सचिनच्या हस्ते उद् घाटन

29 एप्रिलमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज पेणमध्ये होता. पेण नगरपरिषदेतर्फे उभारण्यात येणार्‍या स्टेडियमचे उद्घाटन त्याने केले. सचिनला बघण्यासाठी क्रिकेट फॅन्सनी एकच गर्दी केली होती. स्टेडियमचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण होईल, असे आश्वासन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी दिले. यावेळी स्टेडियमच्या उद्घाटनाला मी स्वत: येईन असे सचिनने कबूल केले. स्टेडियममधील एका पॅव्हेलियनला सचिनचे नावही देण्यात आले आहे. यामुळे रायगडमधून अनेक खेळाडू निर्माण होतील, अशी अपेक्षाही सचिनने व्यक्त केली. अर्थमंत्री सुनिल तटकरे यांच्या हस्ते सचिनचा यावेळी सत्कारही करण्यात आला.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 29, 2010 03:34 PM IST

पेणमधील स्टेडियमचे सचिनच्या हस्ते उद् घाटन

29 एप्रिल

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज पेणमध्ये होता. पेण नगरपरिषदेतर्फे उभारण्यात येणार्‍या स्टेडियमचे उद्घाटन त्याने केले.

सचिनला बघण्यासाठी क्रिकेट फॅन्सनी एकच गर्दी केली होती.

स्टेडियमचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण होईल, असे आश्वासन अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी दिले. यावेळी स्टेडियमच्या उद्घाटनाला मी स्वत: येईन असे सचिनने कबूल केले.

स्टेडियममधील एका पॅव्हेलियनला सचिनचे नावही देण्यात आले आहे. यामुळे रायगडमधून अनेक खेळाडू निर्माण होतील, अशी अपेक्षाही सचिनने व्यक्त केली.

अर्थमंत्री सुनिल तटकरे यांच्या हस्ते सचिनचा यावेळी सत्कारही करण्यात आला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2010 03:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close