S M L

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे निधन

Samruddha Bhambure | Updated On: Nov 7, 2016 12:49 PM IST

भाजपच्या ज्येष्ठ नेत्या जयवंतीबेन मेहता यांचे निधन

07 नोव्हेंबर: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या व माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांचं आज निधन झालं. त्या 77 वर्षांच्या होत्या. मुंबईतील राहत्या घरी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. गृहिणी असलेल्या जयवंतीबेन यांनी 1962 साली राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर नगरसेवक, आमदार, खासदार अशी एकामागोमाग एक पदं भूषवत त्यांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदापर्यंत मजल मारली होती.

लोकसभेत त्यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात आलेल्या एनडीए सरकारमध्ये त्यांनी ऊर्जा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती.

'मार्चिंग विथ टाइम' नावाचं इंग्रजी आत्मचरित्रही त्यांनी लिहिलं होतं.

जयवंतीबेन मेहता

जन्म - 20 डिसेंबर 1938 (औरंगाबाद)

1962 - राजकारणात प्रवेश

1968 - राजकीय कारकीर्दीला सुरुवात, सलग दोनवेळा नगरसेवक

1975 - आणीबाणीच्या काळात 19 महिने तुरुंगवास

1978 - विधानसभेत दोनवेळा आमदार

1989 - पहिल्यांदा खासदार (ईशान्य मुंबई)

1991-1995 - भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा

1993 -1995 - भाजपच्या केंद्रीय उपाध्यक्षा

1996, 1999 - दक्षिण मुंबईतून खासदार - वाजपेयी सरकारच्या काळात केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 7, 2016 08:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close