S M L

हुतात्म्यांची कैफियत मांडणारे मोहाडीकर

प्रीती खान, मुंबई30 एप्रिलसंयुक्त महाराष्ट्रातील लढ्यात निरपराध लोकांवर सरकारने बेछूट गोळीबार केला. त्यातील मृतांची माहिती गोळा करण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. पण मोरारजी देसाईंची ही दडपशाही झुगारून हुतात्म्यांच्या कैफियती लिहिण्याचे धाडस मुंबईतील राम मोहाडीकर यांनी केले. संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्म्यांना गुंड म्हणण्याचे धाडस मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी जाहीर सभेत केले. या वक्तव्याने दुखावलेल्या राम मोहाडीकरांनी या हत्येचा पाठपुरावा करण्याची शपथ घेतली.गोळीबारात मृत झालेल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची वैयक्तीक माहिती त्यांनी गोळा केली. आणि या हुतात्म्यांची कैफियत लिहायला सुरुवात केली. पण ते छापायचे धाडस कोणीच दाखवले नाही.फक्त केसरी छापायला तयार झाले. अत्रेंनीसुध्दा नकार दिला. नोकरी करणार्‍या मोहाडीकरांनी दोन महिने सुट्टी घेऊन हुतात्म्यांची स्वखर्चाने माहिती गोळा केली. ज्याचे त्यांना प्रत्येकी 10 रुपये मिळाले. ही रक्कमही त्यांनी हुताम्यांच्या नातेवाईकांना मदत दिली. केसरीतील त्यांच्या या कैफियतीची ख्याती थेट मोरारजी देसाईपर्यंतही पोहचली. त्यानंतर मोरारजींनी मला ही कैफियत बंद करायला सांगितली. पण यातील प्रत्येक गोष्ट सत्य असल्याची खात्री त्यांना पटल्यानंतर मोरारजींनी माझी माफी मागितली, असेही ते म्हणाले. ही माफीच हुतात्म्यांसाठी खरी श्रद्धांजली होती, असे मोहाडीकर सांगतात.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2010 11:05 AM IST

हुतात्म्यांची कैफियत मांडणारे मोहाडीकर

प्रीती खान, मुंबई

30 एप्रिल

संयुक्त महाराष्ट्रातील लढ्यात निरपराध लोकांवर सरकारने बेछूट गोळीबार केला. त्यातील मृतांची माहिती गोळा करण्याची तसदीही सरकारने घेतली नाही. पण मोरारजी देसाईंची ही दडपशाही झुगारून हुतात्म्यांच्या कैफियती लिहिण्याचे धाडस मुंबईतील राम मोहाडीकर यांनी केले.

संयुक्त महाराष्ट्रातील हुतात्म्यांना गुंड म्हणण्याचे धाडस मुख्यमंत्री मोरारजी देसाईंनी जाहीर सभेत केले. या वक्तव्याने दुखावलेल्या राम मोहाडीकरांनी या हत्येचा पाठपुरावा करण्याची शपथ घेतली.

गोळीबारात मृत झालेल्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांची वैयक्तीक माहिती त्यांनी गोळा केली. आणि या हुतात्म्यांची कैफियत लिहायला सुरुवात केली. पण ते छापायचे धाडस कोणीच दाखवले नाही.

फक्त केसरी छापायला तयार झाले. अत्रेंनीसुध्दा नकार दिला.

नोकरी करणार्‍या मोहाडीकरांनी दोन महिने सुट्टी घेऊन हुतात्म्यांची स्वखर्चाने माहिती गोळा केली. ज्याचे त्यांना प्रत्येकी 10 रुपये मिळाले. ही रक्कमही त्यांनी हुताम्यांच्या नातेवाईकांना मदत दिली.

केसरीतील त्यांच्या या कैफियतीची ख्याती थेट मोरारजी देसाईपर्यंतही पोहचली. त्यानंतर मोरारजींनी मला ही कैफियत बंद करायला सांगितली.

पण यातील प्रत्येक गोष्ट सत्य असल्याची खात्री त्यांना पटल्यानंतर मोरारजींनी माझी माफी मागितली, असेही ते म्हणाले. ही माफीच हुतात्म्यांसाठी खरी श्रद्धांजली होती, असे मोहाडीकर सांगतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2010 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close