S M L

जळगावातही गाड्या जाळल्या

30 एप्रिलनाशिक पाठोपाठ जळगावातही मध्यरात्री टू व्हिलर जाळण्याचा प्रकार झाला आहे. शहरातील विसनजी नगर या भरवस्तीत ही घटना घडली. यात अज्ञात गुंडांनी पाच वाहने जाळली. जळगावच्या भर वस्तीत हा प्रकार घडला. शहरातील अत्यंत शांत आणि सुरक्षित म्हणून विसनजी नगर परिसर ओळखला जातो. तेथे हा प्रकार कोणी आणि का केला त्याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही. घराबाहेर लावलेल्या बाईकची पेट्रोलची नळी काढून आणि गाडीखाली कचरा गोळा करून ही आग लावण्यात आली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2010 11:23 AM IST

जळगावातही गाड्या जाळल्या

30 एप्रिल

नाशिक पाठोपाठ जळगावातही मध्यरात्री टू व्हिलर जाळण्याचा प्रकार झाला आहे.

शहरातील विसनजी नगर या भरवस्तीत ही घटना घडली. यात अज्ञात गुंडांनी पाच वाहने जाळली. जळगावच्या भर वस्तीत हा प्रकार घडला.

शहरातील अत्यंत शांत आणि सुरक्षित म्हणून विसनजी नगर परिसर ओळखला जातो. तेथे हा प्रकार कोणी आणि का केला त्याबाबत काहीही माहिती मिळू शकलेली नाही.

घराबाहेर लावलेल्या बाईकची पेट्रोलची नळी काढून आणि गाडीखाली कचरा गोळा करून ही आग लावण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2010 11:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close