S M L

राष्ट्राध्यक्षाच्या आखाड्यात डोनल्ड ट्रंप यांची वाचाळगिरी

Sachin Salve | Updated On: Nov 8, 2016 12:07 AM IST

Trump मानस जोशी, 8 नोव्हेंबर : अमेरिकेत आतापर्यंत झालेल्या निवडणुकांपैकी या निवडणुकीत अगदी खालच्या थराला जाऊन प्रचार झाला. ट्रम्प यांची मुस्लिम विरोधी वक्तव्यं, महिलांबद्दलचे त्यांचे उद्गार यामुळे अमेरिकेसारख्या लोकशाही राष्ट्राला मोठा धक्का पोहोचलाय. या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात जेव्हाजेव्हा दहशतवादी हल्ले झाले तेव्हातेव्हा ट्रम्प यांनी त्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतली. अमेरिकेत ओरलँडोमध्ये झालेल्या गोळीबारानंतर ट्रम्प जे बोलले त्यावरून त्यांचं चारित्र्यच स्पष्ट होतं.

अमेरिकेत ऑरलँडोमध्ये झालेला गोळीबार हा 9/11 नंतरचा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला आहे. अमेरिकेमध्ये निवडणुकांचं वातावरण तापलं असताना हा हल्ला झालाय. त्यामुळे आपला मुस्लिमविरोधी अजेंडा राबवणारे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनल्ड ट्रम्प यांना आयती संधीच मिळाली. हा हल्ला झाल्यानंतर काही तासातच आपण मुस्लीमांबद्दल कसे बरोबर होतो. अशी बढाई त्यांनी ट्टिवटरवरून मारली. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही त्यांनी टार्गेट केलं. ओबामांनी तातडीने राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.

पॅरिसचा दहशतवादी हल्ला असो, बेल्जियमध्ये झालेले ब्रसेल्सचे स्फोट असो. प्रत्येक दहशतवादी हल्ल्यानंतर डोनल्ड ट्रम्प यांनी त्याचं राजकीय भांडवल करत आपला धोशा कायम ठेवला.

अमेरिकेत 9/11 नंतर जशी मुस्लिमविरोधी भावना होती..तशीच काहीशी स्थिती या दहशतवादी हल्ल्यांमुळे पुन्हा आलीय. आणि डोनल्ड ट्रम्प याच मुस्लिम विरोधी भावनेचा वापर करत आपली राजकीय पोळी भाजून घेतायत. सोशल मीडियावरची त्यांची काही ्‌टिटव्स बघा...

ब्रसेल्स हल्ल्यानंतर..डॉनल्ड ट्रम्प म्हणतात,तुम्हाला आठवतं ब्रसेल्स किती सुंदर शहर होतं? पण आता इस्लामी दहशतवादी तिथेसुध्दा पोचलेत. अमेरिकेने यातून धडा घेतला पाहिजे.

पॅरिस हल्ल्यानंतर डॉनल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करून अमेरिकेला इशाराच दिला. ते म्हणाले, आता पॅरिसमध्येही दहशतवादी हल्ला झालाय. राष्ट्रीय आणीबाणी जाहीर झालीये. बघा. यातून धडा घ्या.

आणि आता ओरलँडो हल्ल्यानंतर ही त्यांची त्यांची राजकीय पोळी भाजणं सुरूच ठेवलं. डॉनल्ड ट्रम्प म्हणतात,इस्लामी दहशतवादाबद्दल मी सांगत होतो तेच बरोबर होतं. माझं आता अनेकजण अभिनंदन करत आहेत. माझं अभिनंदन करू नका. आपण आता दहशतवादाविरोधात आणखी दक्ष राहायला हवं.

अमेरिकन अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत डॉनल्ड ट्रम्प यांना त्यांच्या मीडिया सेन्सने चांगलाच हात दिलाय. ते स्वत: रिऍलिटी टीव्ही स्टार असल्याने मीडियातून प्रसिध्दी मिळवण्याचं तंत्रही त्यांना चांगलंच जमतं. आत्ताच्या अमेरिकन निवडणुकांमध्ये तर सोशल मीडिया हाच प्रचाराचा अविभाज्य भागच बनलाय.आणि त्यात डॉनल्ड ट्रंप बादशहा ठरतायत.

अमेरिकेच्या निवडणुकीत आता डेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षातर्फे डॉनल्ड ट्रम्प यांच्यात थेट लढत होणारेय. डोनल्ड ट्रम्प आत्तातरी अमेरिकेतल्या परिस्थितीचा फायदा उठवत आपला प्रचार पुढे रेटतायत. पण अमेरिकेच्या विकासासाठी म्हणून काही ठोस धोरण त्यांच्याकडे आहेत का हा प्रश्न मात्र जसाच्या तसा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2016 12:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close