S M L

'फायटर' हिलरी क्लिंटन यांची संघर्षमय कहाणी

Sachin Salve | Updated On: Nov 15, 2016 08:42 PM IST

'फायटर' हिलरी क्लिंटन यांची संघर्षमय कहाणी

08 नोव्हेंबर : एक महिला म्हणून हिलरी क्लिंटन यांच्यासाठी हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. वैयक्तिक आयुष्यात आणि राजकीय कारकिर्दीतही त्यांनी अनेक आव्हानांना समर्थपणे तोंड दिलंय.

अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून इतिहास घडवायला हिलरी क्लिंटन सज्ज झाल्यायत. 69 वर्षांच्या हिलरी निवडणुकीच्या प्रचारामध्ये जोशाने उतरल्या. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांच्यासारख्या माणसालाही हिलरींनी तेवढीच जोरदार टक्कर दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदानं हिलरींना इतकी वर्षं हुलकावणी दिली. पण हा सगळा लढा हिलरींनी न हरता लढला.

निवणुकीच्या अगदी शेवटच्या आठवड्यातही एफबीयने त्यांच्या खाजगी ई मेल प्रकरणी प्रश्न उपस्थित केले पण हिलरी डगमगल्या नाहीत. ट्रम्प यांनी हिलरींवर कोणते आरोप करायचं सोडलं नाही ? ई मेल प्रकरण, भ्रष्टाचार, वैयक्तिक पातळीवरची अत्यंत खालच्या दर्जाची टीका, प्रचारामध्ये आलेले आजारपणाचे अडथळे हे सगळं पार करत हिलरींची घोडदौद सुरूच राहिली.

अमेरिकेच्या या फर्स्ट लेडी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बनल्या तर तिस•यांदा व्हाईट हाऊसमध्ये राहण्याचा मान हिलरींना मिळणार आहे. याआधी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री म्हणूनही त्यांनी मोठीजबाबदारी सांभाळलीय. अमेरिकेसारख्या महासत्तेचा कारभार नेमका कसा चालतो याचा खूप जवळून अनुभव हिलरींनी घेतलाय.

अमेरिकेतल्या शिकागोमध्ये जन्म झालेल्या हिलरींनी महासत्तेची राष्ट्राध्यक्ष होण्यापर्यंत मजल गाठलीय. 1975 मध्ये हिलरींचा बिल क्लिंटन यांच्याशी विवाह झाला तेव्हा हे दोघंही जण कधीतरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील, असं

कुणाला स्वप्नातही वाटलं नसेल. पती आणि पत्नी या दोघांनीही एखाद्या देशाचं सर्वोच्च पद भूषवण्याचं हे अत्यंत दुमिर्ळ उदाहरण ठरणार आहे.

बिल क्लिंटन आणि हिलरींचं हे सहजीवन त्यांना या ऐतिहासिक टप्प्यावर घेऊन आलंय. या प्रवासात हिलरींनी कायकाय पाहिलं नाही ? बिल क्लिंटन यांच्या मोनिका लेवेन्स्की प्रकरणी आलेलं वादळ हिलरींनी कसं झेललं असेल हे फक्त त्यांनाच ठाऊक. खरंतर हिलरी क्लिंटन यांनी बिल क्लिंटन यांना घटस्फोट द्यावा, अशा प्रतिक्रिया तेव्हा उटमत होत्या. पण एक व्यक्ती म्हणून, एक स्त्री म्हणून झालेली सगळी मानहानी दूर सारत हिलरींनी बिल क्लिंटन यांना साथ दिली.

एकेकाळी बिल क्लिंटन यांचा असलेला करिश्मा आता त्यांच्यासोबत तितकासा हिलेला नाही पण हिलरींचा प्रभाव मात्र कायम आहे. चांगलं शिक्षण, व्यवसाय, संपत्ती असं सगळं असताना हिलरींची कारकीर्द आकाराला आलीच. पण त्यानंतरची वादळं, आपल्याविरुद्ध पडणारं आयुष्याचं दान या सगळ्यावर हिलरींनी केलेली मात आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 8, 2016 12:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close