S M L

नोटा बदलण्याच्या निर्णयानंतर सुधीर मुनंगटीवारांनी बोलावली तातडीची बैठक

Samruddha Bhambure | Updated On: Nov 9, 2016 11:44 AM IST

Mungantiwar213

09 नोव्हेंबर : नरेंद्र मोदी यांनी काल (मंगळवारी) काळ्या पैशाला चाप  बसण्यासाठी सर्वात मोठी घोषणा करून आर्थिक भूकंप घडवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीला अर्थसचिव, अर्थ विभागाचे अधिकारी, आरबीआयचे प्रतिनिधी उपस्थित असतील.

आज दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे. केंद्राने नोटा बदलण्याचा निर्णय घेतल्यानंतर गैरसोय टाळण्यासाठीच्या नियोजनाविषयी या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

 काळा पैश्यावाल्यांचं कंबरडं मोडण्यासाठी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा एतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  घेतला आहे. काल मंगळवारी (8 नोव्हेंबर 2016)च्या मध्यरात्रीपासून 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून रद्दबातल करण्यात आल्या आहेत. तर त्याबदल्यात नवी 500 आणि 2 हजारच्या नोटा चलनात येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2016 11:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close