S M L

केवळ फुलं वाहून इतिहास कळत नाही...

30 एप्रिलहुतात्मा स्मारकाला केवळ फुलं वाहून लढ्याचा इतिहास कळत नाही, असा टोला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला आहे. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला अखेर शिवाजी पार्कवर उभारलेल्या शिवरायांच्या ब्राँझ भित्तीशिल्पाचे अनावरण आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. त्यावेळी त्यांनी ही टोलेबाजी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची ओळख करून देणार्‍या दादरच्या महापौर बंगल्याजवळील कलादालनाचे उद् घाटनही बाळासाहेबांनी केले. शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा मुद्दा गेले अनेक दिवस चर्चेत आहे. या सुशोभीकरणाला मनसेने आक्षेप घेतला. यानंतर एका जनहित याचिकेवर हायकोर्टानेही या कामाला स्थगिती दिली आहे. पण अपूर्ण काम पूर्ण करण्याची मुभाही कोर्टाने महापालिकेला दिल्याने आज काम पूर्ण करून हे उद्घाटन केले गेले. पण अशा प्रकारे उद्घाटन करणे हा कोर्टाचा अवमान असल्याचा आक्षेप मनसेने नोंदवला आहे. यावर आता पाच तारखेला सुनावणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 30, 2010 05:38 PM IST

केवळ फुलं वाहून इतिहास कळत नाही...

30 एप्रिल

हुतात्मा स्मारकाला केवळ फुलं वाहून लढ्याचा इतिहास कळत नाही, असा टोला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला अखेर शिवाजी पार्कवर उभारलेल्या शिवरायांच्या ब्राँझ भित्तीशिल्पाचे अनावरण आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. त्यावेळी त्यांनी ही टोलेबाजी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची ओळख करून देणार्‍या दादरच्या महापौर बंगल्याजवळील कलादालनाचे उद् घाटनही बाळासाहेबांनी केले.

शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा मुद्दा गेले अनेक दिवस चर्चेत आहे. या सुशोभीकरणाला मनसेने आक्षेप घेतला. यानंतर एका जनहित याचिकेवर हायकोर्टानेही या कामाला स्थगिती दिली आहे.

पण अपूर्ण काम पूर्ण करण्याची मुभाही कोर्टाने महापालिकेला दिल्याने आज काम पूर्ण करून हे उद्घाटन केले गेले. पण अशा प्रकारे उद्घाटन करणे हा कोर्टाचा अवमान असल्याचा आक्षेप मनसेने नोंदवला आहे. यावर आता पाच तारखेला सुनावणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 30, 2010 05:38 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close