S M L

पंतप्रधानांच्या 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे कॉमनमॅन सुखावला

Sachin Salve | Updated On: Nov 9, 2016 10:36 PM IST

पंतप्रधानांच्या 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे कॉमनमॅन सुखावला

09 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल रात्री देशाला मोठा शॉक दिला. 500 आणि एक हजारच्या नोटा बाद करण्याचा निर्णय अनेकांवर वीजेसारखा पडला. पण यानं देशातला मध्यमवर्ग आणि गरीब मात्र सुखावलेत.

काळा पैशाला आळा घालण्याबाबत कालचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. लाखो कोटी रुपयांची रोख बाद झालीय. यानं काळा पैसा असणारे जरी दुखावले असले, तर देशातला सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि गरीब माणूस मात्र सुखावलाय. त्याला काल रात्री शांत झोपही लागली. हा, काही दिवस खरेदी करताना त्रास होईल. सुट्टे नसतील.. दुकानदार नाही म्हणेल. पण याला हा कॉमन मॅन तयार आहे. स्वतः प्रामाणिक आयुष्य जगायचं, आणि दुस•यानं भ्रष्टाचारातून कमावलेलं खोटं वैभव पाहत राहायचं, याला तसाही तो कंटाळला होताच. आता मात्र तो खूश आहे .

2014 साली मोदी सत्तेवर आले, ते काळा पैशाला आळा घालीन, या आश्वासनावरही. नोक•या, विकास आणि भ्रष्टाचाराचा नाश हे भाजपच्या जाहीरनाम्यातले प्रमुख मुद्दे. काही महिन्यांपूर्वी काळा पैशाबद्दल सरकारला माहिती देण्याची योजना सरकारनं राबवली. 'ही शेवटची संधी आहे', हे सरकारनं स्पष्टपणे सांगितलं होतं. पण आता मात्र, सरकारनं सिक्सरच मारला. काळा पैसा बादच करून टाकला. आता रद्दीत विकायचा की शेकोटी करायची, असे विनोदही सुरू झालेत.

या निर्णयाला एक कारण दहशतवादही आहे. असं म्हणतात पाकिस्तान स्वतःचं चलन जेवढं छापतो, त्याहून जास्त भारताचं नकली चलन छापतो. आणि ह्या फेक नोटा दहशतवाद फंड करण्यासाठी वापरल्या जातात. पाकिस्तानला या मुद्द्यावरही धक्का देणं गरजेचं होतं. शेवटी काय, देशातला सामान्य माणूस सूज्ञ आहे. त्याला माहितीय, एक दोन दिवस त्रास झाला तरी हे सगळं त्याच्या भल्यासाठीच चाललंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 9, 2016 08:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close