S M L

एटीएम आजही सुरू न झाल्याने ग्राहकांची गैरसोय

Samruddha Bhambure | Updated On: Nov 11, 2016 02:25 PM IST

BANK RUSH

11 नोव्हेंबर : मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर आज (शुक्रवारी) एटीएम सुरू होणार होती. त्यामुळे सकाळपासूनच एटीएमवर ग्राहकांनी गर्दी केली. मात्र एटीएम बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली.

आज एटीएम सुरू होणार असल्याने बँकेत गर्दी करण्यापेक्षा एटीएममधून पैसे काढण्यासाठी सकाळी सकाळीच ग्राहकांनी एटीएम सेंटर्सवर धाव घेतली. मात्र बहुतांश ठिकाणी एटीएम बंद असल्याने ग्राहकांना पैसे न घेताच परत फिरावे लागत होते. तर अजूनही पैसे न भरल्याने एटीएम बंद असल्याचं सांगण्यात येत होतं. तर काही ठिकाणी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत पैसे भरले जातील. त्यानंतर एटीएम सुरू होतील असं सांगण्यात आलं.

एकूणच काय तर मोदींच्या घोषणेने लोकांची आजही तारांबळ उडाली आहे. एटीएमचा पर्यायही आज जास्त काही करु शकेल अशी परिस्थिती नाही. कारण सेंटर्सच्या बाहेर सकाळपासूनच गर्दी होत असल्याने त्यातील पैसेही लवकरच संपतील मग काय असा प्रश्न दुपारपर्यंत पुन्हा निर्माण होणार अशीच चिन्हे आहेत. त्यामुळे आता एटीएममधून व्यवहार केव्हा सुरळीत सुरु होईल, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2016 10:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close