S M L

राज्याच्या तिजोरीत 24 तासांमध्ये 1 अब्ज कर जमा

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2016 12:00 AM IST

   राज्याच्या तिजोरीत 24 तासांमध्ये 1 अब्ज कर जमा

11 नोव्हेंबर : नोटबंदीचा सामान्यांना त्रास होत असला तरी, राज्याच्या तिजोरीला याचा मोठ्या प्रमाणात फायदा झालाय. 500 आणि 1000 च्या नोटांचा स्विकार करत असल्यानं राज्यात 24 तासांमध्ये 100 कोटींचा कर नागरिकांनी भरलाय. त्यात सर्वाधिक करभरणा हा पुणे महापालिकेत झालाय.

पुण्यातून तब्बल 21 कोटी 85 लाखांचा करभरणा झालाय तर नाशिक पालिकेत साडे तीन कोटींच्यावर नागरिकांना करभरलाय. तर नागपूरमध्ये तीन कोटी सात लाख आणि ठाणे पालिकेत सहा कोटी 15 लाखांचा करभरणा झाला आहे

8 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपासून एक हजार आणि पाचशे रुपये मुल्यांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्या आहेत. यामुळे नागरीकांची अडचण होवू नये यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा, थकबाकी भरण्यासाठी 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नागरिकांकडून या जुन्या चलनाच्या नोटा स्वीकारण्याची परवानगी देण्यात आली.

आज दुपारी 4.00 वाजेपर्यंत विविध करांपोटी 82 कोटी 13 लाख 59 हजार रुपयांचा भरणा केला आहे. मध्यरात्रीपर्यंत विविध करांपोटी भरण्याची रक्कम 120 कोटी पेक्षा अधिक होईल असा विश्वास सचिव श्रीमती म्हैसकर-पाटणकर यांनी व्यक्त केलाय.

विक्रमी करभरणा

बृहन्मुंबई महानगरपालिका- 1 कोटी 97 लाख

नवी मुंबई - 3 कोटी 3 लाख

कल्याण-डोबिंवली - 5 कोटी 16 लाख

मीरा-भाईंदर - 2 कोटी 3 लाख

वसई- विरार - 2 कोटी 23 लाख

उल्हासनगर - 4 कोटी 50 लाख

भिवंडी - 1 कोटी

पिंपरी चिंचवड - 5 कोटी 25 लाख

ठाणे - 4 कोटी 25 लाख

सांगली-कुपवाड - 1 कोटी 70 लाख

कोल्हापूर - 51 लाख

अहमदनगर - 1 कोटी 35 लाख

नाशिक - 3 कोटी 50 लाख

धुळे - 1 कोटी 9 लाख

जळगांव - 87 लाख 41 हजार

मालेगांव - 75 लाख 54 हजार

सोलापूर -1 कोटी 75 लाख

औरंगाबाद - 1 कोटी 84 लाख

नांदेड-वाघाळा - 1 कोटी 7 लाख

अकोला - 55 लाख

अमरावती - 1 कोटी 10 लाख

नागपूर - 3 कोटी 55 लाख

परभणी - 11 लाख 64 हजार

चंद्रपूर - 46 लाख

राज्यातील सर्व नगरपालिका- 14 कोटी 28 लाख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2016 09:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close