S M L

बनावट नोटा ओळखण्याची बँक कर्मचाऱ्यांची अग्निपरीक्षा

Sachin Salve | Updated On: Nov 11, 2016 10:39 PM IST

प्रवीण मुधोळकर, नागपूर, 11 नोव्हेंबर : काळ्या पैशांसोबत बनावट नोटांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद केल्यानंतर आता बँकांपुढे बनावट नोटा तपासण्याचे आवाहन आहे. गेल्या सहा वर्षांत रिझर्व्ह बँकेने तब्बल 160 कोटी रुपयांचे बनावट नोटा जप्त केल्याचं आरटीआयमध्ये सांगितलं आहे.500 note33

पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा मोडित काढल्यानंतर या नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये गर्दी उसळलीये. या गर्दीमुळे बँकांपुढे एक संकट निर्माण झालंय. ते संकट म्हणजे बनावट नोटांचं....नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या लोकांकडे बनावट नोटा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या सहा वर्षांत बँकांकडे जवळपास 160 कोटींच्या बोगस नोटा जमा झाल्या. बाजारात तर याहून अनेक पटीनं खोट्या नोटा असाव्यात असा अंदाज आहे.

ज्या ग्राहकांकडे खोट्या नोटा सापडतात. त्यांच्याकडून एक अर्ज भरुन त्यांना परत पाठवलं जातं.बाजारातल्या या नोटा आता हळूहळू बँकांमध्ये येऊ लागल्यात. बहुतांश बँकांमध्ये खोट्या नोटा ओळखणारी यंत्र आहेत. पण प्रत्येक बँकेत या मशीन्स आहेत असं नाही. शिवाय गर्दी असल्यानं प्रत्येक नोट पारखून निरखून घेता येत नाही. पण काही बँकांनी मात्र अशा मशीनमधूनच तपासणी होत असल्याचं सांगितलंय.

पाचशे आणि हजाराच्या बनावट नोटा ओळखण्याची खरी अग्निपरीक्षा बँक कर्मचाऱ्यांची आहे. बँका हे अग्निदिव्य कसं पेलतात हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 11, 2016 10:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close