S M L

607 साक्षीदार, 13 हजार पानांचे आरोपपत्र

3 मे26/11च्या हल्ल्यात एकूण 607 साक्षीदार तपासले गेले. 287 साक्षीदारांची प्रत्यक्ष साक्ष झाली. तर 320 साक्षीदार हे प्रतिज्ञापत्राद्वारे तापसण्यात आले. कसाबच्या वकीलांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यातील 48 साक्षीदारांना कोर्टात बोलावण्यात आले. आणि प्रत्यक्षरित्या त्यांची साक्ष नोंदवण्यात आली.या खटल्याचे संपूर्ण आरोपपत्र 13 हजार पानांचे आहे. मुख्य आरोपपत्र 166 पानांचे आहे. या खटल्यात एकूण 311 आरोप ठेवण्यात आलेत. यातील 35 आरोपी फरार आहेत. तर कसाबसह सबाउद्दीन आणि फहीम अन्सारी हे तीन आरोपी अटकेत आहेत.या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. तर 238 जण जखमी झाले होते. 14 एप्रिल 2009 ला या खटल्याची सुनावणी सुरू झाली होती. आणि 31 मार्च 2010 ला त्याची अंतिम सुनावणी झाली. या हल्ल्यात सीएसटी स्टेशनवर 52, कामा इन हॉस्पिटलमध्ये 7, कामा आऊटमध्ये 7, हॉटेल ताजमध्ये 36, हॉटेल ओबेरॉयमध्ये 35, गिरगावमध्ये 1, कॅफे लिओपोल्डमध्ये 2, विलेपार्लेतील टॅक्सीमधील स्फोटात 2, ़माझगाव टॅक्सीत 3, कुबेर बोटीत 1, आणि नरीमन हाऊसमध्ये 11जण ठार झाले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2010 08:51 AM IST

607 साक्षीदार, 13 हजार पानांचे आरोपपत्र

3 मे

26/11च्या हल्ल्यात एकूण 607 साक्षीदार तपासले गेले. 287 साक्षीदारांची प्रत्यक्ष साक्ष झाली. तर 320 साक्षीदार हे प्रतिज्ञापत्राद्वारे तापसण्यात आले.

कसाबच्या वकीलांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यातील 48 साक्षीदारांना कोर्टात बोलावण्यात आले. आणि प्रत्यक्षरित्या त्यांची साक्ष नोंदवण्यात आली.

या खटल्याचे संपूर्ण आरोपपत्र 13 हजार पानांचे आहे. मुख्य आरोपपत्र 166 पानांचे आहे. या खटल्यात एकूण 311 आरोप ठेवण्यात आलेत. यातील 35 आरोपी फरार आहेत. तर कसाबसह सबाउद्दीन आणि फहीम अन्सारी हे तीन आरोपी अटकेत आहेत.

या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. तर 238 जण जखमी झाले होते. 14 एप्रिल 2009 ला या खटल्याची सुनावणी सुरू झाली होती. आणि 31 मार्च 2010 ला त्याची अंतिम सुनावणी झाली.

या हल्ल्यात सीएसटी स्टेशनवर 52, कामा इन हॉस्पिटलमध्ये 7, कामा आऊटमध्ये 7, हॉटेल ताजमध्ये 36, हॉटेल ओबेरॉयमध्ये 35, गिरगावमध्ये 1, कॅफे लिओपोल्डमध्ये 2, विलेपार्लेतील टॅक्सीमधील स्फोटात 2, ़माझगाव टॅक्सीत 3, कुबेर बोटीत 1, आणि नरीमन हाऊसमध्ये 11जण ठार झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2010 08:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close