S M L

भयंकर !, काट्याच्या ढिगात आंधळ्या भक्तांच्या उड्या

Sachin Salve | Updated On: Nov 12, 2016 09:05 PM IST

भयंकर !, काट्याच्या ढिगात आंधळ्या भक्तांच्या उड्या

katebars12 नोव्हेंबर :"हर बोला...हर-हर महादेव" असा जयघोष करीत ढोल-ताशांच्या गजरात, गुलालची मुक्त उधळण करीत,उघड्या अंगाने बाभळीच्या काट्यांच्या ढीगामध्ये उड्या घेत, पाण्यामध्ये सूर मारल्या प्रमाणे काट्यांच्या ढिगात सुर मारणारे भक्तगण पाहुण पाहणा-यांच्या अंगावर काटे उभे राहिले नाहीतर नवल वाटावे, असे दृश्य आज गुळुंचे येथील लोकांना पाहवयास मिळाले. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळूंचे येथील "काटेबारस' यात्रेत हजारो भाविकांनी हा रोमांच अनुभवला. काटे बारशीचा हा थरार अनुभवण्यासाठी राज्यातील विविध भागातून हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

यात्रेनिमित्त दिवाळीत पाडव्यास घटस्थापना होवून कार्तिक शुद्ध द्वादशीपर्यंत नियमितपणे छबिना आणि कीर्तन यांसारखे धार्मिक कार्यक्रम राबवले गेले. या दरम्यान अखंड बारा दिवस गुळूंचेमधील ग्रामस्थांनी आणि महिलांनी उपवास केले. आज पहाटेपासून गुळूंचेमधील भाविकांनी प्रथेनुसार देवाला ओल्या अंगाने दंडवत घातले. आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास देवाची पालखी बहिणीच्या (काठीच्या) भेटीसाठी टाळ- मृदंगाच्या आणि ढोल-ताशांच्या गजरात ज्योतिर्लिंग मंदिरापासून प्रस्थान केले. पालखीच्या भव्य सोहळ्याने काठीला प्रदक्षिणा घालून आरती केली.

दरम्यान, मंदिरासमोरील प्रांगणात बाभळींच्या काट्यांचा मोठ्याप्रमाणात भाविकांनी ढीग रचला. सुमारे एक तासाच्या कालावधीनंतर पालखीचे मंदिरासमोरील रचलेल्या काट्यांच्या ढीगाकडील प्रांगणात आगमन झाले. पालखी सोहळ्याने अत्यंत उत्साही, भक्तिमय वातावरणात नामघोष करत काट्यांच्या ढीगाला प्रथेप्रमाणे पाच प्रदक्षिणा घालून पालखी मंदिरात नेण्यात आली.पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड झुंबड उडाली होती. या नंतर सुमारे 75 भाविकांनी उघड्या अंगाने काट्याच्या ढिगामध्ये उड्या घेतल्या.

काय आहे प्रथा ?

भारतामध्ये भक्तीच्या अनेक प्रथा परंपरा पाहवयास मिळतात काही ठिकाणी देवाचे नामस्मरणा केले जाते. काही ठिकाणी उपासतापास, केले जात तर काही भक्त शरीराला कष्ट देवून देवाची भक्ती करत असतात. गुळुंचे येथेही अशीच कट्यामध्ये उड्या मारून शरीराला वेदना देत भक्ती केली जाते. आपल्या रुसून गेलेल्या बहिणीला सन्मानाने घरी आणले तरी बहिणीच्या मनामधील राग गेला नाही. त्यामुळे देवाने प्रायश्चित म्हणून काट्याच्या ढिगात उडी घेतली काट्याच्या ढिगात उडी घेतल्याने भावाची झालेली अवस्था पाहून देवाच्या बहिणीला देवाची द्या आली आणि तिचा रुसवा निघाला.अशी अख्यायिका येथील देवाबद्दल येथे सांगितली जाते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 12, 2016 09:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close