S M L

फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन निर्दोष

3 मे26/11च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला आज कोर्टीने दोषी ठरवले. पण त्याचबरोबर कसाबला मुंबईत मदत करणारे फहीम मोहम्मद युसुफ अन्सारी (वय 35) आणि सबाउद्दीन (वय 24) यांना मात्र स्पेशल कोर्टाने निर्दोष ठरवले आहे. तसेच त्यांच्याविरोधातील साक्षी-पुरावे व्यवस्थित न सादर केल्याबद्दल कोर्टाने तपासयंत्रणांवर ताशेरेही ओढले आहेत. फहीम आणि सबाउद्दीनने कसाबला पुरवलेल्या नकाशांमुळेच कसाब मुंबईवर सुनियोजित हल्ला करू शकला, असा दावा करत पोलिसांनी कोर्टात कसाबच्या खिशातील नकाशा सादर केला होता. पण 26/11च्या धुमश्चक्रीत सामील असलेल्या ईस्माईलच्या खिशात हा नकाशा कोराकरीत कसा सापडला, असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. तसेच या आरोपीच्या विरोधात हौसाबाई भोसले आणि त्यांचे नातेवाईक तसेच इतरांच्या साक्षीही कोर्टाने ग्राह्य धरल्या नाहीत. खटल्यादरम्यान फहीमचे वकील शाहीद मारले गेले. त्यानंतर ऍड. मोकाशी यांनी फहीमचे वकीलपत्र घेतले होते. विशेष कोर्टाच्या या निर्णयावर सबाउद्दीनचे वकील एजाझ नक्वी आणि फहीम अन्सारीच्या वकील सबा कुरेशी यांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांनी कोर्टात खोटे पुरावे सादर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर कोर्टाच्या निर्णयामुळे न्याय मिळाल्याची भावना सबाुद्दीनची पत्नी यासीन हिने व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: May 3, 2010 10:58 AM IST

फहीम अन्सारी आणि सबाउद्दीन निर्दोष

3 मे

26/11च्या हल्ल्यातील प्रमुख आरोपी अजमल कसाब याला आज कोर्टीने दोषी ठरवले.

पण त्याचबरोबर कसाबला मुंबईत मदत करणारे फहीम मोहम्मद युसुफ अन्सारी (वय 35) आणि सबाउद्दीन (वय 24) यांना मात्र स्पेशल कोर्टाने निर्दोष ठरवले आहे.

तसेच त्यांच्याविरोधातील साक्षी-पुरावे व्यवस्थित न सादर केल्याबद्दल कोर्टाने तपासयंत्रणांवर ताशेरेही ओढले आहेत.

फहीम आणि सबाउद्दीनने कसाबला पुरवलेल्या नकाशांमुळेच कसाब मुंबईवर सुनियोजित हल्ला करू शकला, असा दावा करत पोलिसांनी कोर्टात कसाबच्या खिशातील नकाशा सादर केला होता.

पण 26/11च्या धुमश्चक्रीत सामील असलेल्या ईस्माईलच्या खिशात हा नकाशा कोराकरीत कसा सापडला, असा सवाल कोर्टाने उपस्थित केला. तसेच या आरोपीच्या विरोधात हौसाबाई भोसले आणि त्यांचे नातेवाईक तसेच इतरांच्या साक्षीही कोर्टाने ग्राह्य धरल्या नाहीत.

खटल्यादरम्यान फहीमचे वकील शाहीद मारले गेले. त्यानंतर ऍड. मोकाशी यांनी फहीमचे वकीलपत्र घेतले होते.

विशेष कोर्टाच्या या निर्णयावर सबाउद्दीनचे वकील एजाझ नक्वी आणि फहीम अन्सारीच्या वकील सबा कुरेशी यांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांनी कोर्टात खोटे पुरावे सादर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तर कोर्टाच्या निर्णयामुळे न्याय मिळाल्याची भावना सबाुद्दीनची पत्नी यासीन हिने व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2010 10:58 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close