S M L

नागपुरात रिकाम्या फ्लॅटमध्ये सापडली 1 कोटी 87 लाखांची रोकड, 4 जणांना अटक

Samruddha Bhambure | Updated On: Nov 14, 2016 11:48 AM IST

नागपुरात रिकाम्या फ्लॅटमध्ये सापडली 1 कोटी 87 लाखांची रोकड, 4 जणांना अटक

14 नोव्हेंबर : नागपूर शहरात हिलटॉप परिसरात एका फ्लॅटमधून तब्बल 1 कोटी 87 लाख 50 हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. यामध्ये चलनातून बंद केलेल्या 500 आणि 1000 च्या नोटांचा समावेश आहे. याप्रकरणी, पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतलं आहे.

यासंबंधी आयकर विभागाला पूर्णपणे माहिती दिली असून रक्कमेसंदर्भात आयकर विभाग तपास करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

ताब्यात घेतलेल्या 4 जणांपैकी एक जण आपण चार्टर्ड अकाऊंटंट असल्याचं सांगत आहे. त्यामुळे आयकर विभाग सध्या पैशाचा स्रोत तपासून पाहत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 14, 2016 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close